मुंबई

ओ हो, क्या बात हैं ! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी शोधले चार 'लघुग्रह', युवा शास्त्रज्ञांची 'नासा'कडून दखल...

सकाळवृत्तसेवा

ठाणे : लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश थबकला असला तरी, घरात बसुन या संधीचा सदुपयोग कसा करावा,याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांनी दिले आहे. ठाण्यात राहणाऱ्या अक्षत मोहिते आणि पेण येथील प्रज्ञेश म्हात्रे या दोन महाविद्यालयीन युवकांनी अंतराळातील चार लघुग्रह शोधले आहेत. 

युवा शास्त्रज्ञांच्या शोधाची दखल अमेरिकेतील नासाने घेतली आहे. यापुर्वी अंतरिक्ष प्रकल्प साकारणाऱ्या अक्षतची निवड तर, नासाचा ट्रेनी अॅस्ट्रोनॉट म्हणुन देखील झाल्याने ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन येथे राहणारा अक्षत मोहीते अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात तर, पेणचा प्रज्ञेश अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकतो. अंतरिक्ष प्रकल्पाच्या सादरीकरणाच्या निमित्ताने अक्षतने अमेरिका वारी तर, प्रज्ञेशने संशोधनाच्या ध्यासापोटी स्वित्झलॅंडचा दौरा केला आहे. या दोघांनी एप्रिल 2020 मध्ये 'नासा'द्वारे आयोजित करण्यात आलेल्या "इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलँब्रेशन" या मोहिमेत सहभाग घेतला होता. 

या मोहिमेमध्ये त्यांना "नियर अर्थ ऑब्जेक्ट (NEO)" आणि "मेन बेल्ट ऍस्टिरॉईड" मध्ये असलेल्या लघुग्रहांचे शोध घ्यायचे होते. त्याकरीता त्यांना अमेरिकेतील हवाई इथे असलेल्या पॅन स्टार्स (Pan-STARRS) वेधशाळा आणि ऍरिझोना येथे असलेल्या कॅटलीना स्काय सर्व्हे या वेधशाळेमधून शोध करण्याची संधी मिळाली. या संधीच सोनं करून दोघांनी 4 लघुग्रह शोधण्यात यश मिळवले. या लघुग्रहांची नोंद दोघांच्या नावावर झाल्याने त्यांनी हा सर्व डेटा आता पुढील चाचणीसाठी पाठवला आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊन काळात घरातच लॅपटॉपवर काम करून त्यांनी ही कामगिरी बजावली आहे. जी अतिशय अवघड अन, कौतुकास्पद आहे. त्यांनी शोधलेल्या लघुग्रहांची नोंद नासाच्या डिरेरेक्टरीमध्ये करण्यात आली असून, याबाबतचे मानपत्रदेखील मिळाले आहे. 

युवकांची गरुडझेप
अक्षत मोहितेच्या सॅक्झीमो (psaximo) या अंतरीक्ष प्रकल्पाची अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेच्या नॅशनल स्पेस सोसायटीने दखल घेतल्याचे वृत्त सर्वप्रथम दैनिक सकाळने (ता.28 मे 2018) मध्ये दिले होते. त्याची दखल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील घेतली होती. आता चार लघुग्रहांचा शोध घेऊन अक्षत व प्रज्ञेश या युवकांनी गरूडझेप घेतली आहे. डिसेंबरमध्ये मुंबईत सुरू झालेल्या नॅशनल स्पेस सोसायटीचा अक्षत अध्यक्ष, तर प्रज्ञेश उपाध्यक्ष आहे.

Students discovered four asteroids, young scientists noticed by NASA

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Cabinet Row : मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच डी.के शिवकुमार यांना मोठा झटका, ज्येष्ठ मंत्र्याचा राजानीमा; नेमकं काय घडलं?

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात काळजाचा ठोका चुकवणारी घटना! शौचास गेलेली व्यक्ती पाय घसरून दरीत कोसळली, डोळ्यांदेखत वडील नाहीसे झाल्याने मुलाने...

World Environment Day: वाढदिवशी योगींची मोठी घोषणा! एका दिवसात लावणार तब्बल ५ कोटी झाडे; कुकरैल जंगलातून होणार महाअभियानाचा श्रीगणेशा

World Environment Day 2026: घराबाहेरची नाही, घरातलीच हवा ठरतीये 'Hidden Danger'! दोन ते पाच पट जास्त धोकादायक असल्याचा तज्ज्ञांचा इशारा

डॉ. प्रभात यांचे पुनरागमन! ‘ग्राम चिकित्सालय’ सीझन 2 या तारखेला होणार रिलीज

SCROLL FOR NEXT