mumbai university 
मुंबई

अंतिम वर्षाच्या परीक्षा निर्णयामुळे विद्यार्थी नाराज? समाजमाध्यमांवर तक्रारींचा पाऊस

सकाळवृत्तसेवा

मुंबई : अखेरच्या वर्षाच्या परिक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याने अनेक विद्यार्थी नाराज आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या प्रत्येक दिवसागणिक वाढत असताना परिक्षेचा आग्रह कशाला अशी विचारणा अनेक विद्यार्थी करीत आहेत.

अनेक विद्यार्थ्यांनी ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त करताना उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, मुंबई विद्यापीठाबरोबरच आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांना हॅशटॅग केले आहे. आम्ही कुठे फिरायला जाण्यासाठी परिक्षा घेऊ नका असे सांगत नाही. आमचाही सध्याच्या परिस्थितीत विचार करा, असे ट्विट यश शाहने केले आहे. तर कायराने मुंबई विद्यापीठाने पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ताण कमी केला आहे आमचे काय. जी काही सध्याची परिस्थिती आहे, त्यामुळे तणाव आहेच. त्या परिस्थितीत आम्ही प्रवास करावा आणि परिक्षा द्यावी ही अपेक्षा कशी करता, अशी विचारणा केली आहे. 

सर्वांचाच परिक्षेला विरोध नाही. जय सावला याने मुंबई विद्यापीठाने निर्णय घेताना त्याचे विद्यार्थ्यांवर काय परिणाम होतील याचा विचारच केला नाही असेच काही विद्यार्थी समजत आहेत. लॉकडाऊन कायम राहिल्यास किंवा कोरोनाची साथ कमी न झाल्यास मुंबई विद्यापीठांच्या परिक्षांचे काय होणार हा प्रश्न आहे. मुंबईतील साथ कमी होत नाही, तोपर्यंत सार्वजनिक वाहतूक सुरु होणार नाही, याकडे लक्ष वेधतात. मुंबई विद्यापीठाची परिक्षा केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रातील विद्यार्थीच देत नाहीत, तर देशातील अनेक विद्यार्थी देतात. हे विद्यार्थी परिक्षेसाठी मुंबईत कसे येणार, मुंबई रेड झोनमध्ये आहे, या परिस्थितीत परिक्षेसाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा धोका वाढणार नाही का अशी विचारणा होत आहे.

Students upset over final year exam decision? complaints on social media

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT