मुंबई

परीक्षांच्या आधी महाविद्यालयांना नमुना प्रश्नपत्रिका आणि मॉक परीक्षा बंधनकारक

तेजस वाघमारे

मुंबई : अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार परीक्षेपूर्वी महाविद्यालयांनी विद्यार्थांसाठी नमुना प्रश्नपत्रिका महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केल्याबाबत आणि मॉक परीक्षा घेतल्याचा अहवाल आपल्या क्लस्टरमधील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कळवावा, असे निर्देश मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने महाविद्यालयांना दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठांनी केली आहे. त्याप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने परीक्षा बहुपर्यायी पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे परीक्षेच्या कालावधीत परीक्षा घेऊन निकाल जाहीर होईपर्यंत सर्व महाविद्यालयातील प्राचार्य आणि उपप्राचार्य यांनी रजा घेऊ नये. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्चमारी यांनी आवश्यकतेनुसार नियमित कार्यालयात हजार रहावे, अशी सूचना केली आहे.

विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंबंधी असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी महाविद्यालयात हेल्प डेस्कची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही विद्यापीठाने केली आहे. प्रत्येक महाविद्यालयातील प्राचाऱ्यांनी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत ऑनलाइन पद्धतीने संवाद साधावा आणि परीक्षेची माहिती द्यावी, असेही विद्यपीठाने पत्रात म्हंटले आहे. महाविद्यालयांनी परीक्षा सुरळीत व वेळेत पार पडण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, अशी सूचनाही परीक्षा  मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

submission of mock exams and specimen question paper is mandatory for universities 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT