मुंबई

बनावट कागदपत्रांद्वारे बॅंकेची कोट्यवधीची फसवणूक; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

अनिश पाटील

मुंबई : बनावट कागदपत्राच्या साह्याने वाहन कर्ज घेऊन राष्ट्रीयकृत बँकेची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. बँकेच्या महिला व्यवस्थापकाने याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कार डिलर कंपनीचे कर्मचारी व ग्राहक रघुनाथ राणे, गणेश उभारे, राहिल खान, अविध घरत, झेड. मद्रासवाला, शाही आलम व विशाल तिवारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्रारीनुसार, राणे एका कार डिलर कंपनीचा कर्मचारी होता. 2018 मध्ये तो तक्रारदार बॅंक व्यवस्थापकाकडे आला होता. घरत याने पजेरो कार खरेदी केली असून त्यांना तीस लाख रुपयांचे वाहन कर्ज हवे राणे यांनी बँकेला सांगितले. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर 29 लाख 60 हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले. हे पैसे कार कंपनीच्या खात्यात जमा झाले. पण त्यानंतरही राणेकडून कारचा नोंदणीकृत क्रमाांक प्राप्त झाला नाही. बरेच दिवस झाल्यानंतरही वाहनाचा नोंदणी क्रमांक प्राप्त न झाला नाही. 

पुढे आणखी तीन ग्राहक झेड. मद्रासवाला, शाही आलम व विशाल तिवारी या तीन ग्राहकांसाठी कार डिलरकडून कर्जाचे अर्ज आले. त्यातही कागदपत्रांची पडताळणी करून 29.34 लाख, 29.55 लाख व 29.55 लाख रुपयांचे कर्ज अनुक्रमे वितरीत करण्यात आले. सुरूवातीचे तीन महिने कर्जाचे हफ्ते भरण्यात आले. त्यानंतर कर्जाचे हफ्ते येणे बंद झाले. तसेच रजिस्ट्रेशन क्रमांकाच्या कागदपत्रांची पूर्तताही करण्यात आली नाही. त्यानंतर जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केल्यानंतर त्यातील काही कागदपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले.

तसेच अधिक चौकशी केली असता कार डिलर कंपनीच्या खात्यातून पैसे वैयक्तिक खात्यावर वळते करून त्याचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर कार डिलर कंपनीकडे तपासणी केली असता ग्राहकांना गाडी न आवडल्यामुळे त्यांनी गाडी घेतली नसल्याचे सांगितले. त्यानंतर कार डिलर कंपनीने त्या गाड्या विकून पैसे देण्याचे आश्वासन दिले. पण ती रक्कम न मिळाल्यामुळे अखेर महिला बँक व्यवस्थापकाने याप्रकरणी बोरीवली पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार नुकतीच पोलिसांनी कट रचणे, बनावटी करणे व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
----
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

SCROLL FOR NEXT