मुंबई

मोठी बातमी : सुशांतच्या घराच्या तपासणीत त्याच्या हत्येच्या दाव्याबाबत पुरावा सापडला?

अनिश पाटील

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येतेय. गेल्या चार दिवसांपासून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुशांतच्या घरात आत्महत्येचा घटनेच्या सत्यतेती पडताळणी करत आहे. अशात सुशांतच्या हत्येचा दाव्याला बळकटी मिळेल असे कोणतेही पुरावे अद्याप तरी सीबीआयला सापडले नाहीत. मात्र अधिक सखोल तपासणीसाठी न्यायवैद्यक शाळेच्या एका पथकाने देखील सीबीआयच्या सांगण्यावरुन सुशांतच्या घराची झडती घेतली आहे.

घटनास्थळी केलेल्या सीन रिक्रेएशनमधून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत

  • सुशांतच्या खोलीत इतर कोणत्याही मार्गातून आतमध्ये येऊ शकत नव्हतं
  • सुशांतने ज्या खोलीमध्ये आत्महत्या केली होती त्या खोलीची उंची 12 फूट आहे
  • सुशांतची उंची पाच फुट 9 इंच होती तर त्याच्या पलंगाची उंची 4 फूट आहे.
  • सीबीआयच्या मते हे रिक्रिएशन केल्यानंतर प्राथमिक निरिक्षणात ही आत्महत्या असल्याचं वाटतंय
  • कुणी सुशांतला मारून लटकवले असेल असं ठोसपणे काहीही समोर आलेलं नाही 

सीबीआयच्या सूत्रांच्या मते, सुशांतच्या आत्महत्येवेळी त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता आणि त्याच्या खोलीमध्ये कुणीही इतर मार्गाने आतमध्ये जाऊ शकत नाही. खिडकीतून देखील कुणी येऊ शकत नाही. सीबीआयने या घटनेतील सर्व घटनांच्या सत्यता पडताळून पाहिल्या आहेत.

सीबीआयकडून सुशांतच्या वांद्रे येथील घरी आत्महत्येची घटना रिक्रिएट केली. त्यानंतर पुराव्यांची देखील तपासणी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्याने आत्महत्या केली नसल्याचा दावा केला होता. यामध्ये त्याची उंची आणि घराच्या उंचीशी ताळमेळ नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

बेडपासून फॅनपर्यंतची उंची सुशांतच्या उंचीच्या जवळपास असल्याने ती आत्महत्या नसल्याचा अनेकांचा दावा आहे. सुशांतच्या मृत्यूच्या वेळी उपस्थित चार जणांसोबत सीबीआयने पुन्हा क्राइम सीन रिक्रिएट केला. सुशांत दार उघडत नसल्याने चारही जणांनी काय केले. या बाबींची पुरावृत्ती करण्यात आली. यावेळी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी देखील उपस्थित होता.

केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाची मदत घेणार : 

सुशांत हा ड्रग्जच्या आहारी गेला असुन, त्याला दुबईच्या ड्रग्ज डिलरकडुन ड्रग्ज मिळत असल्याचा दावा एका साक्षीदाराने केला आहे. त्यामुळे या दाव्यातील सत्यता पडताळणी सुरू आहे. त्यासाठी डीलरची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून माहिती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

(संकलन - सुमित बागुल )

sushant singh rajaput case details of what CBI found by doing recreation at SSR place

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

Latest Marathi News Updates Live : वेरूळ घाटात टँकर पलटी होऊन दोन निष्पाप जीवांचा अंत

OBC Reservation: ''ओबीसींचं आरक्षणच संपलं..'', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत दिला जीव

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

SCROLL FOR NEXT