मुंबई

रिया चक्रवर्तीचे दावे एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोंखडेनं फेटाळले, शेअर केली पोस्ट

पूजा विचारे

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. अभिनेत्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांची सीबीआय चौकशी करत आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान रिया चक्रवर्तीनं न्यूज चॅनल्सला मुलाखत दिली. त्यासोबतच तिनं सीबीआयकडे आपला जबाबही नोंदवला आहे. आपल्या जबाबात रिया चक्रवर्तीनं सुशांत सिंह राजपूतशी संबंधित बरेच दावे केलेत. ज्यावर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अंकिता लोखंडेनं सांगितलं की, मी सुशांतसोबत २०१६ पर्यंत होती. तोपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचं डिप्रेशन नव्हतं. तो पूर्णपणे ठिक होता. यासोबतच अंकितानं सांगितलं की, आम्ही वेगळे झाल्यानंतर मी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर हे नाही सांगितलं की आम्ही एकत्र होतो. 

अंकिता लोखंडेनं आपल्या पोस्टमध्ये सुशांत सिंह राजपूतशी संबंधित बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. तिनं लिहिलं की, सर्वात पहिलं सुरुवाती पासून शेवटपर्यंत मी आणि सुशांत २३ फेब्रुवारी २०१६ पर्यंत एकमेकांसोबत होतो. त्याला डिप्रेशनसारखा कोणताही आजार नव्हता. ना तो कधी कोणत्याही सायक्याट्रिस्टजवळ गेला होता. तो पूर्णपणे ठिक होता. 

पुढे अंकितानं सुशांतबद्दल सांगताना लिहिलं की, मी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर कधी हे नाही म्हटलं की आम्ही वेगळे झाल्यानंतरही एकमेकांच्या संपर्कात होते. खरं हे आहे की मणिकर्णिकाच्या शूटींग दरम्यान सुशांतनं माझ्या पोस्टरवर कंमेट देखील केली होती. त्यानं मला माझ्या सिनेमाबद्दल शुभेच्छा दिल्या होते. ज्यावर मी सुद्धा फक्त रिप्लाय दिला होता. यामुळे मी रियाचे या दाव्याचं खंडन करते. 

अंकिता लोखंडेनं पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, मी आतापर्यंत मुलाखतीत जे काही सांगितलं आहे, जे जोपर्यंत मी आणि सुशांत एकत्र होते. त्याला कोणत्याही प्रकारचं डिप्रेशन नव्हतं. आम्ही एकत्रित त्याच्या पुढच्या आयुष्याबद्दल स्वप्न पाहिली होती. मी त्यासाठी प्रार्थना देखील केली होती आणि तो यशस्वी देखील झाला होता.  मी हे स्पष्ट केलं आहे की, जर मला रियाबद्दल कोणताही प्रश्न विचारला असता. माझं प्रामाणिकपणे एकच उत्तर होतं की मला तिच्या आणि सुशांतच्या रिलेशनशिपबद्दल काहीच माहित नाही. 

Sushant Singh Rajput ex girlfriend Ankita Lokhande Share Post on Rhea Claims

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : घरफोडीच्या गुन्ह्यात अटक, मुद्देमाल जप्त

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT