मुंबई

सुशांतचा अॅटोप्सी रिपोर्ट देण्यात एवढी घाई का?, डॉक्टरांनी केला मोठा खुलासा

पूजा विचारे

मुंबईः  सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काही त्रूटी आढळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुशांतचे पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबई पोलिसांनी डॉक्टरांना लवकरात लवकर शवविच्छेदनाचा रिपोर्ट देण्यास सांगितलं होतं, अशी माहिती सीबीआयच्या चौकशीत समोर आली आहे. 

मुंबई पोलिसांनी लवकरात लवकर पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यास सांगितल्यामुळे हा रिपोर्ट देण्यात घाई झाली, अशी कबुली पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. शनिवारी सीबीआयचं एक पथक कूपर रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांनी डॉक्टरांची चौकशी केली आणि त्यांचा जबाब नोंदवून घेतला. 

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार,  सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर सीबीआयच्या टीमने काही प्रश्न उपस्थित केले. जेव्हा सीबीआयच्या टीमनं डॉक्टरांना सुशांतच्या अॅटोप्सीचा रिपोर्ट देण्यात एवढी घाई का केली असा प्रश्न विचारला असता त्यातील एका डॉक्टरांनी मुंबई पोलिसांचं नाव घेतलं. पोलिसांनीच तसे करण्यास सांगितलं असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.  मुंबई पोलिसांनी लवकरात लवकर रिपोर्ट देण्यास सांगितलं होतं. 

मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरूनच आम्ही रात्री उशीरा सुशांतचे पोस्टमार्टम केल्याचं डॉक्टरांनी सीबीआयला सांगितलं. तसंच कोरोना रिपोर्ट येण्याआधीच सुशांतचे पोस्टमार्टम का केले? यावर डॉक्टरांना समाधानकारक उत्तर देता न आल्याचंही माहिती सुत्रांनी दिली आहे. १४ जूनला सकाळी सुशांतचा मृतदेह त्याच्या बेडरूममध्ये पंख्याला लटकलेला आढळला, त्यानंतर १४ जूनच्या रात्रीच सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यात आला होता.

या रिपोर्टमध्ये सुशांतच्या गळ्यावर ३३ सेंमी  लांब लिगेचर मार्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामान्य भाषेत लिगेचर मार्क म्हणजे, खोल खूण. सुशांतची जीभ बाहेर नव्हती आली. दात ठीक होते, शरीरावर कोणतीही जखम किंवा खूण नव्हती.  रिपोर्टनुसार, सुशांतच्या पापण्या अर्धवट उघडल्या होत्या. शरीरातील कोणतीही हाडं तुटली किंवा मोडलेली नव्हती.  रिपोर्टनुसार, तोंडातून किंवा कानातून फेस अथवा रक्त बाहेर आले नव्हते. मात्र मानेच्या खाली ३३ सेंटीमीटर लांब लिगेचर मार्क होते. फासाची खूण हनुवटीच्या खाली ८ सेंमी होती.  या रिपोर्टनंतर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी पुन्हा या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केलेत.

Sushant Singh Rajput Late night post mortem Mumbai police order doctor tells CBI

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

IPL 2026 Auction live : कहानी मे ट्विस्ट... BCCI ने ६ परदेशी खेळाडूंसह १९ जणांना घुसवले, गौतम गंभीरने 'नाकारले'ला तोही आला...

Latest Marathi News Live Update : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस बदल्यांची शक्यता?

Ichalkaranji Drinking Water Issue : देवाभाऊ आले इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर बोलले आणि गेले, इचलकरंजीला पाणी देण्याचं आश्वासन पूर्ण होणार?

Kolhapur Cyber Crime : मुंबई पोलिस–न्यायालयाचा सेट! निवृत्त प्राध्यापकाचा व्हिडिओ कॉलवरून छळ, भीतीने ७९ लाख दिले अन्

SCROLL FOR NEXT