File Photo 
मुंबई

बेकायदा मद्यविक्रीवर कारवाई करा!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील बेकायदा मद्यविक्री आणि निर्मितीला आळा घालण्यासाठी ग्रामसभेच्या ठरावाचा आधार घेऊन कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. स्थानिक पातळीवरील अशा विक्रीला आळा घालण्यासाठी २६ जानेवारीच्या विशेष ग्रामसभांमध्ये ग्रामरक्षक दल स्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहिली आढावा बैठक रविवारी (ता. १२) झाली. यात उत्पादन शुल्क विभागाच्या आस्थापना, अंमलबजावणी, नियम, कार्यपद्धती, महसूल, मद्यविक्री, बेकायदा मद्यविक्री, गुन्हे या संदर्भात माहिती घेण्यात आली. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाचा महसूल वाढवण्यासाठी बेकायदा मद्यविक्रीला आळा घालावा, त्यासाठी ग्रामसभेच्या ठरावाचा आधार घ्यावा आणि ग्रामरक्षक दलाची ग्रामपंचायत स्तरावर स्थापना करण्याचे निर्देशही या वेळी वळसे पाटील यांनी दिले.

राज्याच्या सीमेवरील गोवा, दादरा, नगरहवेली, मध्य प्रदेश; तसेच, पंजाब, हरियाणा या राज्यांतून येणाऱ्या बेकायदा मद्यामुळे राज्याच्या महसुलावर परिणाम होतो. अशा मद्यविक्रीची खरी माहिती देणाऱ्यांना जप्त केलेल्या मद्याच्या प्रमाणात बक्षीस देण्याबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेशही या वेळी वळसे पाटील यांनी दिले. आढावा बैठकीला उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, आयुक्त प्राजक्ता वर्मा लंवगारे उपस्थित होते.

धक्कादायक मुंबईत ९० रुपयात विकला जातोय मृत्यू
राज्य उत्पादन शुल्कासह कामगार विभागाचाही आढावा घेतला. यानिमित्त सर्व कामकाज समजून घेतले असून, उत्पादन शुल्क विभागाचा महसूल आणि विविध सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 
- दिलीप वळसे पाटील
, राज्य उत्पादन शुल्कमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India SIR Schedule: बिहारनंतर देशातील १२ राज्यांमध्ये एसआयआर लागू, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, जाणून घ्या 'या' राज्यांची नावे

'ह्युमन कोकेन' हिंदी सायकॉलॉजिकल थ्रिलर लवकरच होणार रिलीज ! पुष्कर जोगचा नवा प्रयोग

Bachu Kadu News: 'तर आम्ही छातीवर गोळी घ्यायला तयार', कडू संतापले!

Latest Marathi News Live Update : दहशतवादी विरोधी पथकाकडून कोंढव्यामध्ये दहा ठिकाणी छापे, एकाला अटक

Georai News : अनाथालयात वाढलेला बनला दोन अनाथ मुलींचा पाठीराखा; दत्तक घेत शिक्षणाची जबाबदारी उचलत साजरी केली भाऊबीज

SCROLL FOR NEXT