आव्हाडांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा; राष्ट्रवादीची मागणी 
मुंबई

आव्हाडांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा; राष्ट्रवादीची मागणी

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : सोशल मीडियावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर अश्लील भाषेत टीका करण्यात येत आहे. हत्या करण्याची धमकी दिली जात आहे. अशा समाजकंटकांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये केली आहे.

ही बातमी वाचली का? मुंबईकरांना प्रवेशबंदी! रायगडच्या सागरी सीमा बंद

आनंद परांजपे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, अनंत करमुसे यांनी अत्यंत गलिच्छ शब्दांत गेली 4 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते यांच्याविरोधात लिखाण केले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध अत्यंत अर्वाच्च भाषेत मेसेज टाकण्यात आले आहेत. त्यांच्या पत्नी व मुलीसह तुमचा दाभोलकर करू, असे खुलेआम ट्विटर आणि फेसबुकवर टाकण्यात आले आहे. याविरुद्ध कार्यकर्त्यांकडून उद्रेक झाला तर निष्कारण त्या कार्यकर्त्यांना दोष दिला जातो. याला वेळीच अटकाव करावा आणि तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी परांजपे यांनी केली आहे. 

ही बातमी वाचली का? सारखी शिंक येतीये कोरोना तर नाही ना

आनंद परांजपे यांनी निवेदनासोबत आव्हाड यांना देण्यात आलेल्या धमक्या, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांसंदर्भात केलेल्या अश्लील टिप्पण्यांचा स्क्रीनशॉटही जोडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Reshuffle: दिल्लीत मोठ्या हालचालींची चर्चा! राजनाथ सिंहांनी पद सोडल्यास पुढे काय? अमित शाह यांच्याबाबतही मोठे संकेत?

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या अनेक भागांत २४ तासांत १०० मिमीहून अधिक पाऊस; दिवसभरात जोर वाढणार

Raigad News: महाड-वरंध घाटात भीषण दरड कोसळली; महाड-पुणे मार्ग पूर्णपणे बंद, वाहनचालकांची मोठी गैरसोय!

Mumbai Rain: मुंबईत संततधार! पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट; शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार? महत्त्वाची अपडेट समोर

Explained : ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी Fixing, क्रोएशियावर अन्याय? चाहत्यांनी मैदानावर फेकल्या बाटल्या... VAR च्या निर्णयानंतर नेमकं काय घडलं? Video

SCROLL FOR NEXT