मुंबई

मुंबईत टॅक्सी, रिक्षा भाडेवाढ ? टॅक्सी भाडे 3 रुपये तर, रिक्षा 2 रुपये प्रति किमीने वाढणार

कुलदीप घायवट

मुंबई, 19 : अनेक वर्षांपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ झाली नाही. कोरोना काळात रिक्षा आणि टॅक्सी याचे खूप हाल झाले आहेत. त्यामुळे टॅक्सीसाठी ३ रुपये प्रति किमी आणि रिक्षासाठी २ रुपये प्रति किमी वाढण्याची शक्यता आहे.  मात्र कोरोना आणि लॉकडाऊनची झळ सर्व नागरिकांना बसली आहे. त्यामुळे आधीच खिशाला कात्री पडली असताना आणखीन दरवाढ का, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

अधिकृतपणे अद्याप सरकारने रिक्षा व्यवसायाला परवानगी दिलेली नाही. मात्र जगण्यासाठी रिक्षाचालक रिक्षा चालवीत आहेत. त्यांना दरमहा १० हजार सरकार देऊ शकत नाही. त्यांच्या  इतर मागण्या पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे भाडेवाढ करून कोणाचाच प्रश्न न सुटता, मुंबईकरांची गळपेची करण्यात येणार आहे, अशी भूमिका प्रवासी संघटना आणि वाहतूक संघटनेकडून अशी भूमिका मांडली.

यात्री संघचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले की, मुंबईकरांचे जगणे कठीण झाले आहे. रेल्वे सुरु नसल्याने प्रवाशांना पर्यायी साधनांचा वापर करावा लागत आहे. पगार कपात होणे, जादा काम, नोकरी जाण्याची भीती, कोणाकडून उधारी मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टया मुंबईकर पिचला गेला आहे. त्यामुळे सरकारने  भाडेवाढ करू नये. 

22 डिसेंबर रोजी मुंबईतील टॅक्सी, ऑटो भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे चालू नसल्याने रिक्षा आणि टॅक्सी चालकांना रेल्वेचे प्रवासी भेटत नाही. त्यामुळे भाडेवाढ होणे आवश्यक आहे. मात्र भाडेवाढ ५ किंवा १० रुपयांची होणे अपेक्षित आहे. कारण पुन्हा 2 ते 3  रुपयामुळे सुट्टे पैसे देणे-घेण्यामुळे गोंधळ, भांडणे होण्याची शक्यता आहे, असं ए. एल. क्वाड्रोस ( सरचिटणीस, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन) म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी : 22 आणि 23 तारखेला मुंबईत अनेक भागात पाणी येणार नाही; तुमचा परिसर या लिस्टमध्ये आहे का?

कोरोना काळात प्रत्येकाची स्थिती हलाकीची झाली आहे. त्यामुळे दरवाढ करणे हा मार्ग योग्य नाही. रिक्षाचालकांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी 10  हजार रुपये महिना देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. मात्र ही मागणी पूर्ण झाली नाही.  त्यामुळे सद्यस्थितीत 2 ते 3 रुपये वाढविणे योग्य नाही, असं शशांक राव (अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियन) म्हणालेत. 

तर, 22 डिसेंबररोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडे संदर्भात चर्चा होणार आहे.त्यानंतर भाडेवाढ होणार की नाही, हे ठरणार आहे असं परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे म्हणालेत. 

Taxi rickshaw fare may hike in mumbai rates may increase by two to three rupees

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT