बोरिवली परीक्षा केंद्रावर MH-CET देणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ esakal
मुंबई

Technical Glitch in Exam : MH-CET मध्ये तांत्रिक गोंधळ, विद्यार्थ्यांची मनःस्थिती बिघडली!

Mumbai : बोरिवली परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना त्रास, काही विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलली!

सकाळ वृत्तसेवा

MH-CET Exam : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत आज राज्यात घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी -२०२४ (पीसीएम ग्रुप) च्या परीक्षेचा मुंबईत मोठा गोंधळ उडाला. बोरिवली येथील एल. एन. महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असतानाच काही तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सोसावा लागला.

यामुळे सीईटी सेलनी बोरिवलीच्या या परीक्षा केंद्रावरील परीक्षाच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. बोरिवली येथे सकाळी मुंबईतील विविध ठिकाणांहून या परीक्षा केंद्रावर उमेदवार सकाळी ७.३० वाजताच उपस्थित झाले होते; मात्र त्यानंतर ९ वाजता परीक्षा सुरू झाली. मात्र ती १०.३० वाजता ही परीक्षा तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्याचे अनुभव विद्यार्थ्यांना आले.

दरम्यान, दुपारी २ च्या सत्रातील परीक्षा सुरू होताना सकाळच्या सत्रातील काही विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षा पूर्ण घेण्याची मागणी केली. शुक्रवारी (ता. ११) झालेल्या गोंधळानंतर बोरिवली येथील सकाळच्या सत्रात १८६ विद्यार्थ्यांनी याच परीक्षा केंद्रावर परीक्षा पूर्ण केली, तर द्व‍ितीय सत्रात २५२ विद्यार्थ्यांची परीक्षा ही १५ अथवा १६ मेदरम्यान घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Patil : 'शरद पवार गट सोबत आला तर विचार करू'; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, काँग्रेसला डावलून 'महायुती'चा सत्तेसाठी नवा फॉर्म्युला!

Kolhapur crime news : इचलकरंजी पोलिसांनी घरफोड्या उघडकीस आणल्या पण एसपींनी पोलिसांचीच चौकशी लावली

Russia–US New START Expiry Explained: भयानक इशारा! रशिया–अमेरिका अणु करार संपला, जग पुन्हा न्यूक्लिअर धोक्याच्या उंबरठ्यावर

Nagpur Crime: नागपुरातील एमएच ४० एन हॉटेलमधील देहव्यापारावर छापा; टोळीचा पर्दाफाश, राज्याबाहेरील तीन पीडित महिलांची सुटका!

Kolhapur Kagal Elections : सभा, जेवणावळी, एकगठ्ठा मतदान… कागल निवडणूक कारभाऱ्यांच्या हातात

SCROLL FOR NEXT