home search 
मुंबई

कुणी घर देतं का घर? मुंबईत भाडेकरु नवीन घराच्या शोधात; वाचा काय आहे कारण 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राज्यात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. काही उद्योग व्यवसाय हळूहळू सुरु असले तरी जनजीवन अद्यापही ठप्प आहे. उदरनिर्वाहाचे साधन बंद झाल्याने भाडेकरुंकडे नियमित घरभाडे भरण्यासाठी पैसेही नाहीत. राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यांची आर्थिक परिस्थितीही बिकट झाली आहे. 

 लॉकडाऊन आणि वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता नविन घर तरी कसे शोधावे असा मोठा प्रश्न भाडेकरुंसमोर आहे. घरमालकाशी बोलून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी घरमालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने थकडलेले भाडे आणि नवीन जागेचा शोध अशा दुहेरी संकटात भाडेकरू सापडले आहेत. 

त्यातच घरभाड्यासाठी मालक तगादा लावत असल्याने गृहनिर्माण विभागाने मालकांनी भाडेकरुंकडे पैशांसाठी तगादा लावू नये, भाडे दिले नाही म्हणून हाकलून देऊ नये, असे सक्त आदेश दिले आहेत. तीन महिन्यांपर्यंत भाड्यासाठी सवलत द्यावी, त्यानंतर एकूण भाडे संबंधितांकडून घ्यावे, असेही सांगितले होते. या आदेशाचे पालन मात्र काही घरमालक करत नसून त्यांनी भाडेकरुंना कोणतीही सवलत दिलेली नाही. याऊलट करार संपल्यानंतर घर खाली करण्यास सांगितले आहे. 

याबाबत बोलताना नम्रता पाटील म्हणाल्या "एप्रिलचे अर्धेच भाडे आम्ही दिले आहे. मालक सतत फोन करुन पूर्ण भाडे देण्याविषयी विचारणा करत आहे. आमच्या घरात सध्या एकच व्यक्ती कमावती असून ती कमाईही तुटपूंजी आहे. त्यातच मे महिना कराराचा शेवटचा महिना आहे. पुढील करार वाढवण्यासाठी मालकाने हजार रुपये भाडेवाढ सांगितली आहे. आर्थिक चणचणीमुळे हेच भाडे भरणे कठीण असल्याने नवी जागा कशी शोधावी असा प्रश्न आहे".

 "तीन महिने सवलत मिळाली, परंतू हाताला काम नसल्याने नंतर ती रक्कम कशी अदा करणार हा प्रश्न आहेच", असं संदीप ढवळ यांनी म्हंटलंय.

"आमचा जूनमध्ये करार संपत आहे. लॉकडाऊन अद्याप सुरु असल्याने आम्हाला नविन घराचा शोधही घेता आलेला नाही. घराचा भाडेकरार आणखी वाढवण्यासाठी विनंती करूनही मालक त्यास तयार नाही. एप्रिलचे घरभाडे थकले असून मे महिन्याचेही भाडे देणे शक्य नाही. डिपॉझिटमधून रक्कम वळती केली, तर मग नविन घरासाठी डिपॉझिट कोठून आणायचे याच विचारात आहे," असं नितीन पवार यांनी म्हंटलंय.  

tenants are in search of new home as owners asking of rent read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 World Cup 2026 squad: शुभमन गिलला संघातून का वगळले? अजित आगरकर, सूर्यकुमार यादव एक सूरात म्हणाले, संघहित...

Bangladesh violence : बांगलादेशमध्ये काहीतरी मोठं घडणार? भारताची चिंता वाढली; अमेरिकेनं नागरिकांना दिल्या अलर्ट राहण्याच्या सूचना

हिंजवडीला मी पुणे समजत नाही.... मराठी अभिनेत्रीचं बिनधास्त वक्तव्य चर्चेत, म्हणते- सॉरी पण मी...

India T20 World Cup 2026 Squad Announce : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलचा पत्ता कट, उप कर्णधार बदलला; इशान किशनही परतला

Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला काय करावं अन् काय करू नये, जाणून घ्या सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT