fire 
मुंबई

भिवंडीतील भंगार गोदामांना भीषण आग, धुराचे मोठे लोट

सकाळवृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीमधील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स येथील भंगारचे सामानाची साठवणूक केलेल्या दुकानांच्या पत्राशेड गोदामाच्या गाळ्यांना सोमवारी दुपारी 3 वाजता भीषण आग लागली. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांना आगीच्या घटनेची माहिती देताच जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीवर सहा तासात नियंत्रण मिळविण्यात यश आहे.

पुर्णा व काल्हेर गाव येथील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे भंगाराची साठवणूक केलेल्या बंद असलेल्या पत्राशेडच्या दुकानास सोमवारी दुपारी आग लागली या आगीत सुमारे 40 ते 45 दुकान गाळे जळून खाक झाले आहेत. या भंगार गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वस्तू, कागदी पुठ्ठा, टीव्ही, फ्रीज, कुलरचा टाकाऊ मटेरियल तसेच केमिकलचा साठा देखील साठवून ठेवण्यात आला होता.

आग विझविण्यासाठी भिवंडी, कल्याण आणि ठाणे येथील अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

Terrible fire to the scrap godowns in Bhiwandi, read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT