मुंबई

Corona Virus: ठाण्यातील परिस्थिती चिंताजनक, आता मिशन घोडबंदर

पूजा विचारे

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. अशातच मुंबईजवळचा जिल्हा ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं एक लाखांचा टप्पा पार केला आहे. मंगळवारी १०५१ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णांचा एकूण आकडा १ लाख २०९ इतका झाला आहे. यापैकी ८२ हजार ९२० रुग्ण कोरोनामुक्त झालेत. तर सध्या १४ हजार ४५८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. 

दिवसभरात आणि एकूण मृत्यू 

  • ठाणे ग्रामीणमध्ये- १७ ( २२२)
  • ठाणे-  ४ (७०४)
  • कल्याण-डोंबिवली- १० (४५८)
  • नवी मुंबई-  ७ (४७८)
  • मिरा-भाईंदर- ६ (३२४)
  • उल्हासनगर- २ (१६१)
  • भिवंडी- ३ (२६२)
  • अंबरनाथ- २ (१६८)
  • बदलापूर- २ (५४) रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

घोडबंदरमधील आकडा कमी करण्याचं आव्हान 

ठाणे महापालिका हद्दीतील अतिसंक्रमित क्षेत्रात रुग्णसंख्या झपाटयानं कमी होत चालली आहे. त्यामुळे ठाणे पालिकेला कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश असल्याचं दिसतंय. मात्र घोडबंदरमधील काही भागात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे या भागातील आकडा कमी करण्याचं मोठं आव्हान येत्या दिवसात पालिकेसमोर आहे. ठाणे शहरात सध्या सर्वाधिक दैनंदिन रुग्ण घोडबंदर भागातील आहेत. 

घोडबंदरचा विस्तार मोठा असून येथील नागरी वसाहती विखुरलेल्या आहेत.  लांबवर पसरलेल्या घोडबंदर भागातील सोसायट्यांमधील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्यामुळे पालिकेनं या भागात वेगवेगळ्या पथकांमार्फत रुग्णशोध मोहीम नव्याने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गृहसंकुले आणि नागरी वस्त्यांमध्ये रुग्णशोध मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.

मानपाडा-माजीवडा प्रभाग समितीत मोडणाऱ्या घोडबंदर भागाचा विस्तार इतर भागांच्या तुलनेत मोठा आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे या भागातून मुंबई, पुण्याच्या दिशेने कामानिमित्त जाणाऱ्या रहिवाशांचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे येथे संसर्ग अधिक दिसत असल्याचं मत आरोग्य विभागानं व्यक्त केलं आहे. म्हणूनच विशेष नागरी वसाहतींमध्ये पथकांची नियुक्ती करून आयसोलेशेन आणि रुग्णशोध मोहिमेवर भर देण्यात आला असल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

तसंच घोडबंदर परिसरातील रहिवाशी लॉकडाऊननंतर आता कामानिमित्त घराबाहेर पडू लागलेत. त्यामुळे पुणे, मुंबई तसेच अन्य भागांत नागरिक प्रवास करताना दिसत आहेत. यातून त्यांना कोरोनाची लागण होतेय. एकाला लागण झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनाही लागण होतानाच आढळून येत आहे. त्यामुळे ही रुग्ण संख्या वाढत चालली आहे. मात्र या ठिकाणीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रयत्न सुरू असल्याचं ठाणे महापालिकेचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी म्हटलं आहे.

thane covid 19 condition worst ghodbunder area increasing case

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT