मुंबई

ठाणेकरांनो जागे व्हा!, शहरातली परिस्थिती भयावह

पूजा विचारे

ठाणेः कोरोना व्हायरसनं सर्वत्र धुमशान घातलं आहे. त्यातच मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे शहरातली परिस्थिती भयानक झाली आहे. दिवसेंदिवस शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. १० दिवसांचं लॉकडाऊन असतानाही कोरोनाबाधितांचा आकडा हा ३ हजार ८०० वर पोहोचला तर मृतांचा संख्या १५८ झाली आहे. दरम्यान आता सद्यस्थिती पाहता शहरातील लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आलं आहे. शनिवारी शहरात तब्बल ४५६ रुग्णांची भर पडली असून १७ जणांचा मृत्यू झालाय. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं २ जुलैला शहरात कडक निर्बधासह लॉकडाऊन जाहीर केला. दरम्यान, प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाही  कठोर उपाययोजनांमुळे कोणतीही दिलासा मिळाला नाही.

दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे ३,७९२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर १५८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. शहरात एकूण कोरोना रुग्णांचा आकडा १२,९२५ असून ४८० जणांनी आतापर्यंत जीव गमावला आहे.

आजच्य नवीन प्रकरणांनुसार,  नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात सर्वाधिक १०४ नोंद झाली, त्यानंतर माजिवाडा-मानपाडा ९१,  वागळे-इस्टेटमध्ये ८१,  कळवामध्ये ५१, लोकमान्य-सावरकर भागात ४२, दिवा आणि मुंब्रामध्ये प्रत्येकी १६ नवे रुग्ण आढळले. यामुळेच कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा १२ जुलै (रविवार) ते १९ जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. 

हेल्पलाईन क्रमांक
कोविड -१९ संदर्भातील नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी एक कोविड कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. खालील मोबाइल क्रमांकावर फोन करुन नागरिक या कॉल सेंटरशी संपर्क साधू शकतात. कोविड -१९च्या चाचणीसाठी डॉक्टरांच्या  प्रिस्क्रिप्शनची गरज नसल्याचे ठाणे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

  • ८६५७९०६७९१
  • ८६५७९०६७९२
  • ८६५७९०६७९३
  • ८६५७९०६७९४
  • ८६५७९०६७९५
  • ८६५७९०६७९६
  • ८६५७९०६७९७
  • ८६५७९०६७९८
  • ८६५७९०६८०१
  • ८६५७९०६८०२

बेडची उपलब्धता

आपण रुग्णालये आणि क्वारंटाईन केंद्रांवर बेडची उपलब्धता देखील तपासू शकता किंवा www.covidbedthane.in वर बेडसाठी विनंती करू शकता.

प्रभागनिहाय दक्षता समिती

शहरातील कोविड-१९चा संसर्ग रोखण्यासाठी टीएमसी वॉर्डनिहाय दक्षता समिती स्थापन करणार आहे. नगरसेवक, अधिकारी, नगराध्यक्ष नरेश म्हस्के, आणि मनपा आयुक्त विपिन शर्मा यांच्यासमवेत या विषयासंदर्भात व्हिडिओ कॉन्सफरिंगद्वारे चर्चा करण्यात आली.

Thane covid 19 situation worst complete shutown

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT