covid19 
मुंबई

ठाणे महापालिकेचा भोंगळ कारभार; कोरोनामुक्त रुग्णाला दाखवले पुन्हा पॉझिटीव्ह

सकाळवृत्तसेवा

ठाणे : कोरोनाच्या बाबतीत ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य खात्यामध्ये ताळमेळ नसल्याचे अनेकदा उघडकीस आलेले असतानाच आता आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. कोरोनावर मात करुन 12 मे रोजी घरी परतलेल्या व्यक्तीला चक्क 23 मे रोजीच्या यादीमध्ये पॉझिटीव्ह दाखविण्याचा विचित्र प्रकार घडला आहे.

एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या या व्यक्तीला 17 एप्रिल रोजी केलेल्या तपासणीमध्ये कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या रुग्णास कौशल्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे रुग्णसंख्या वाढू लागल्याने या रुग्णाने नंतर सफायर रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनावर पूर्ण मात केल्यानंतर या रुग्णाला 12 मे रोजी घरी सोडले, तसेच होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पूर्णपणे कोरनामुक्त झालेला ही व्यक्ती खोपट येथील आपल्या निवासस्थानी राहात आहे. 

मात्र, त्यानंतर ठाणे पालिकेने शनिवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये 107 व्या क्रमांकावर या रुग्णाचे नाव त्याच्या राहत्या पत्त्यासह प्रसिद्ध केले. विशेष म्हणजे, ही यादी काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या रुग्णाला अनेकांचे फोन आले. तसेच, हा रुग्ण राहात असलेल्या इमारतीमधील लोकही त्यांच्याकडे संशयाने पाहू लागले होते.

अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर नाही
या रुग्णाने पालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतरही त्यांच्याकडून त्यांना अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत. या प्रकरणात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, ठामपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सदर कोरोनामुक्त व्यक्तीने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT