मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने घेतला स्तुत्य निर्णय; अशापद्धतीने करणार गणेशोत्सव साजरा

राजेश मोरे

ठाणे : गत पाच महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचे संकट कायम आहे. त्यामुळे अनेक सण-उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहे. कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने आगामी सण-उत्सव सुद्धा साधेपणाने आणि अटी-शर्थींसह साजरे केले जाणार आहे. राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवावरही कोरोना संकटाचे सावट आहे. परंतु गणेशोत्सवाची पंरपरा खंडीत होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिकेचा सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत स्तुत्य निर्णय घेतला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे आणि शासनाने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन यंदा दिड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी आज झालेल्या बैठकीत जाहीर केले.

महानगरपालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 38 वे वर्ष आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे हा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत आज महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, माजी महापौर मीनाक्षी  शिंदे, उपायुक्त तथा गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष अशोक बुरपल्ले, प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान, उपनगर अभियंता विनोद गुप्ता, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम, सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे, मंडळाचे कार्यवाह आर.के. पाटील, सचिव, पी.एच.पाटील, खजिनदार संजय माने आदी उपस्थित होते.

महापालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर 'श्री'च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यंदाचा गणेशोत्सव हा दीड दिवस साजरा करुन 'श्री'च्या मूर्तीचे विसर्जन महापालिकेच्या प्रांगणात कृत्रिम हौदात करण्यात येणार आहे. तसेच यावर्षी कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली जाणार नसून अत्यंत साधेपणाने हा उत्सव करण्यात येईल, असे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. ठाणेकरांनी सुध्दा यंदाचा गणेशोत्सव महापालिकेने आखून दिलेल्या सूचनांचे पालन करुन साजरा करावा तसेच गणेशमूर्तीचे विसर्जन घरातच करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT