मुंबई

ठाणे : फेरीवाल्याने छाटली सहायक आयुक्तांची बोटे

महिला अधिकाऱ्याची दोन बोटं तर अंगरक्षकाचं एक बोट कापलं

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कासावडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या माजिवडा मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत त्यांच्या डाव्या  हाताची दोन बोटे कापली गेली आहेत. तर त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या अंगरक्षकाचं या हल्ल्यात एक बोट कापलं गेलं. या दोघांवरही येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी हल्लेखोर फेरीवाल्याला कासारवडवली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना सोमवारी सांयकाळी ६.३० च्या सुमारास घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्या अमरजीत यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील अनाधिकृत बांधकामांपाठोपाठ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. मागील आठवडय़ापासून ही कारवाई सुरु आहे. सोमवारी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यासह पथकानं घोडबंदर भागातील कासारवडवली येथील मुख्य मार्केटमध्ये कारवाई केली. यावेळी फुटपाथ आणि रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर सांयकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ही कारवाई सुरु होती.

यावेळी एका फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पथक पुढे जात असताना संतप्त झालेल्या या हल्लेखोर फेरीवाल्याने रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकू हल्ला केला. फेरीवाल्याने त्यांच्या डोक्यावर चाकू भिरकवला. यावेळी हल्यापासून बचावासाठी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवला, त्यात हा हल्ला त्यांच्या हातावर झाला आणि त्यामध्ये त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे कापली गेली आणि तुटून खाली पडली. तर पिंपळे यांच्यावरील हल्ला रोखण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या अंगरक्षकाच्याही डाव्या हाताचे एक बोट कापले गेले.

या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोर अमरजित यादव  याला नागरिकांच्या मदतीने अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT