Traffic jam
Traffic jam sakal media
मुंबई

ठाण्यातील पार्किंग प्रश्‍न, कोंडीची समस्या सुटणार

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगची समस्या (Parking problem in thane city) दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडीला (traffic jam) निमंत्रण मिळत आहे. कोंडीची ही समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाने (thane municipal corporation) पावले उचलण्यास सुरुवात केली असून, पार्किंग सुविधेसह भूमिगत वाहनतळ, ट्रक टर्मिनस उभारण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात (budget) तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न, त्यातून उद्भवणारी वाहतूक कोंडीची समस्याही लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत.

ठाणे शहरासह रेल्वेस्थानक परिसरात वाहनतळाची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. अशातच रेल्वेने प्रवास करणारे ठाणेकर घर ते रेल्वे स्थानकपर्यंतच्या प्रवासासाठी दुचाकींचा वापर करतात. मात्र, स्थानक परिसरात वाहनांच्या पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्याने पार्किंग करायचे कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला जात आहे. त्यात अनेक दुचाकी व चारचाकी वाहन चालकांकडून बेशिस्तपणे रस्त्याच्या कडेलाच वाहने पार्क करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळते. याची दखल पालिकेने वाहनांच्या पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकल्प राबवण्याचे नियोजन केले आहे. वाहन पार्किंग व्यवस्थेसाठी १० कोटींची, तसेच भूमिगत वाहनतळासाठीही १० कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे.

अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीसह अपघातही होत आहेत. त्यामुळे या अवजड वाहनांनाही ट्रक टर्मिनल उभारण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार मॉडेला मिल येथे ट्रक टर्मिनस विकसित करण्यात येणार असून, लेखाशीर्षाअंतर्गत एक कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली असून, अवजड वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी खासगीकरणातून खारेगाव येथे ट्रक टर्मिनस विकसित करण्याचेही नियोजन आहे.

प्रदूषण नियंत्रणासाठी पुढचे पाऊल

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत ठाण्याचे प्रदूषण कमी करून हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी ४८ कोटींचा निधी उपलब्ध होणार असून एकूण ९६ कोटींची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये परिवहन सेवेकरिता ८१ इलेक्ट्रिक बस, वागळे इस्टेट स्मशानभूमीमध्ये पीएनजी शवदाहिनी, डस्ट स्विपिंग मशीन खरेदी करणे, पालापाचोळा, कचऱ्याचे व्यवस्थापन, धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी मीस्ट स्प्रे मशीनची उभारणी करणे आदी प्रकल्प राबवले जाणार आहेत.

घनकचऱ्याचे व्यवस्थापन

- मौजे डायघर येथील प्रस्तावित घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाकरिता पहिल्या टप्प्यात १२०० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. याकरिता २० कोटींची तरतूद
- शहरातील बैठी घरे, डोंगर उतारावरील झोपडपट्ट्या, दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये निर्माण होणाऱ्या दैनंदिन २०० टन कचऱ्याच्या संकलनाकरिता १० कोटींच्या निधीतून ५० ई-रिक्षा.
- पालिका क्षेत्रातील निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याकरिता मौजे भंडार्ली प्रकल्पासाठी ५ कोटींची तरतूद प्रस्तावित.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

SCROLL FOR NEXT