palghar
palghar sakal
मुंबई

जांभा फरशी ते मलवाडा फाटा घाट रस्ता होतोय धोकादायक

अमोल सांबरे

विक्रमगड : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अत्यारात जव्हार- विक्रमगड ,वाडा- विक्रमगड, मनोर- विक्रमगड, तलवाडा- विक्रमगड, मलवाडा- विक्रमगड हे मुख्य रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची(Public works Department) आहे. या रस्त्याची देखभाल दरवर्षी केली जाते. परंतु ज्या मुख्य रस्त्यावर घाट व वळणं, दरी आशा ठिकाणी संरक्षण भिंती (protect wall)बांधण्याची आवशकता असताना मात्र गेल्या अनेक वर्षा पासून या कडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. जव्हार- पाली मुख्य रस्त्यावरील मलवाडा फाटा ते जांभा फरशी हा चार-पाच किलोमीटर अंतराचा घाट रस्ता अत्यन्त धोका दायक बनला असून. जव्हार हे उप जिल्ह्याचे ठिकाण असल्याने व त्रंबकेश्वर, नाशिक, शिर्डी कडे जाणारा शॉर्ट-कट रस्ता असल्याने या मुख्य रस्त्यावरून हजारो वाहने रोज ये- जा करत असतात. (The road from Jambha Farshi to Malwada Fata Ghat is dangerous)

चाळीस वर्षा पूर्वी घाट रस्त्यावर बांधलेल्या दगडी संरक्षण कठडे दरी मधी कोसळू लागले असून या घाटात अनेक वेळा छोटे मोठे अपघात हि झाले आहेत. मात्र या कडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्याच प्रमाणे हा रस्ता डोंगराळ व घाटाचा वळणाचा असल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर दरडी कोसळून वाहतूकीला अडथळा हि निर्माण झाला आहे. त्यामुळे या चार-पाच किलोमीटर घाट रस्त्यावर सिमेंटचे संवरक्षण कठडे ( भिंती ) बांधण्याची मागणी जिल्हा परीषद सदस्य संदीप पावडे यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार यांना निवेदन देऊन केली आहे.

दगडी संवरक्षण कठडे( भिंती ) चाळीस वर्षा पूर्वीच्या

जव्हार- पाली रस्त्यावर साखरा पासून सुरु होणारा ते टोपलेपाडा पर्यँत चार-पाच किलो मीटरचा रस्ता हा डोंगर दऱ्यातुन येणारा घाट रस्ता, वळणा वळणाचा,खोल दरीचा आहे. या रस्त्यावरून रोज हजारो वाहने प्रवास करतात मात्र या रस्त्यावर बांधलेले कठडे ( भिंती ) या दगडाच्या व चाळीस वर्षा पूर्वीच्या असल्याने त्या दगडीचे कठडे( भिंती ) दरीत कोसळू लागल्या असून त्याच बरोबर रस्त्याला हि धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात अनेक वेळा डोंगरच्या दरडी,झाडे कोसळून वाहतूकीला अडथळे हि निर्माण झाले आहेत. त्यामुळे या चाळीस वर्षा पूर्वीच्या दगडी संवरक्षण कठडे ( भिंती ) देखभाळी कडे लक्ष देऊन नवीन सिमेंटचे कठडे व धोकादायक धूप झालेल्या दरडीना लोखंडी जाली मारण्याची मागणी रोज येजा करणाऱ्या वाहनचालकांन कडून करण्यात येत आहे.

नाशिक, शिर्डी,त्रंबकेश्वर कडे जाण्यासाठी या मार्गाचा होतो मोठा वापर:

जव्हार- विक्रमगड हा मुख्य रस्ता त्रंबकेश्वर, नाशिक,शिर्डी कडे जाणारा शॉर्ट कट रस्ता व पर्यायी रस्ता असल्याने त्रंबकेश्वर व शिर्डीचा यात्रेचा काळात या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. वसई, विरार,गुजरात, वापी, वलसाड, भाईंदर, कल्याण भिवंडी, मुंबई या ठिकाणचे भाविक मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात हा मार्ग खूपच अरुंद, वळणा वळणाचा, दरीचा असल्याने व संवरक्षण कठडे खूपच जुने असल्यानं हा मार्ग धोका दयाक ठरू शकतो त्या साठी सां. बा विभागाने या घाट रस्त्या कडे लक्ष देण्याची मागणी भाविकांनी केली जात आहे. व लवकरात लवकर धोका दायक दरडीना लोखंडी जाली, कमकुवत दगडी कथ्द्यान ऐवजी सिमेंटचे कठडे, अरुंद रस्ते वाढवण्याची मागणी भाविकान कडून व वाहनचालकान कडून करण्यात आली आहे.

जव्हार-पाली मार्गावरील मलवाडा फाटा ते जांभा फरशी अपघाती क्षेत्राच्या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कडे तातडीने लक्ष देऊन या घाट रस्तावर संवरक्षण भिंत व इतर उपाय योजना तातडीने कराव्यात. या बाबत मी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार यांना निवेदन दिले आहे.

- संदीप पावडे

(जिल्हा परीषद सदस्य)

मलवाडा फाटा ते टोपले पाडा पर्यँत घाट रस्त्याच्या संवरक्षण कठडे अत्यंत जुने दगडांचे असून ते कठडे खचू लागले आहे, हा रस्ता अरुंद, खोल दरीचा व पावसाळ्यात धोका दायक दरडीन मुले या मार्गावर प्रवास जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या कडे सां. बा विभागाने लक्ष देऊन सिमेंटचे कठडे, धोकादायक दरडीना लोखंडी जाल्या माराव्यात,अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करावे

-विनोद कव्हा ( वाहन चालक )

विक्रमगड बातमीदार-अमोल सांबरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT