Vaccine-No-Stock 
मुंबई

"राज्य सरकारचे योग्य नियोजन नसल्याने लसीकरण मोहिमेला फटका"

"राज्य सरकारचे योग्य नियोजन नसल्याने लसीकरण मोहिमेला फटका" इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचे मत The vaccination drive slowed down due to lack of proper planning by the state government Says IMA former Doctor

मिलिंद तांबे

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचे मत

मुंबई: राज्य सरकारचे नियोजन योग्य नसल्याने त्याचा फटका लसीकरण मोहिमेला बसत असल्याचे रोखठोक मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागात याचा सर्वाधिक फटका बसत आहे. अनेक ठिकाणच्या केंद्रांवर सध्या लसी उपलब्ध नाहीत. त्यातच लोकांमध्येही लसीकरणाबाबत फारशी जागृती दिसत नसल्याने लसीकरण मोहिम काहीशी मंदावली आहे, असेही डॉ. भोंडवे म्हणाले. त्यामुळे लसीकरण न झालेली लोकं तसेच सध्याचा लसीकरणाचा वेग पाहिला तर राज्यातील संपूर्ण लसीकरण व्हायला अजून कमीत कमी एक वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली. (The vaccination drive slowed down due to lack of proper planning by the state government Says IMA former Doctor)

लसींचा तुटवड्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. गेल्या पाच महिन्यात राज्यात जेमतेम 3 कोटी 69 हजार 790 (30%) व्यक्तींची लसीकरण झाले आहे. याच वेगात लसीकरण सुरू राहिले, तर संपूर्ण राज्यातील लसीकरण पूर्ण व्हायला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात 16 जानेवारी पासून लसीकरणाला सुरुवात झाली. गेल्या पाच महिन्यात 3 जुलै पर्यंत एकूण 3 कोटी 69 हजार 790 व्यक्तींचे लसीकरण झाले. यामध्ये केंद्राकडून मिळालेल्या 2 कोटी 75 लाख 59 हजार 060 डोस व राज्याने मिळवलेल्या 25 लक्ष 10 हजार 739 डोस चा समावेश आहे.

राज्यात सध्या दिवसाला 3 लाखांच्या वर लसीकरण होत आहे. 5 जुलै ला राज्यात 3,25,518 लोकांचे लसीकरण झाले. मात्र हा वेग खूपच कमी आहे. त्यातच लसींचा पुरवठा बंद झाला की अनेक लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागतात. त्यामुळे लसीकरण अधिक लांबण्याची शक्यता आहे. राज्यात अद्याप साधारणत: साडे सहा कोटी लोकांचे लसीकरण बाकी आहे. त्यासाठी दुप्पट म्हणजे साधारणता 12 कोटी लसींची आवश्यकता आहे. राज्यांची मंदार ही केंद्र सरकारच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. मात्र केंद्रा कडून अपेक्षित पुरवठा होतांना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील लसीकरण बऱ्याचदा रखडल्याचे दिसते.

केंद्राकडून मिळालेले एकूण डोस

कोव्हीशिल्ड - 2,36,16,260 / कोव्हॅक्सीन - 39,42,800 / एकूण - 2,75,59,060

--------

राज्याने मिळवलेले एकूण डोस

कोव्हीशिल्ड - 20,31,580 / कोव्हॅक्सीन - 4,79,150 / एकूण - 25,10,730

---------

राज्यातील एकूण लसीकरण- 9.5 कोटी

आतापर्यंत लसीकरण झाले- 3 कोटी

अद्याप लसीकरण बाकी- 6.5 कोटी

आवश्यक लसींचे डोस- 12 कोटी

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Reality Explained: नेपाळ सरकारचं खरंच चुकलं की Gen Z चा अभ्यास कमी पडला? खरं वास्तव काय?

आनंदाची बातमी! 'साेलापूर जिल्ह्यात पाेलिस दलात २२५ पदांची भरती'; सप्टेंबरअखेर भरा अर्ज, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ‘मैदानी’चे नियोजन

Who is Sushila Karki? सुशीला कार्की नेपाळच्या प्रमुखपदी? भारतासाठी आनंदाची बातमी की नवी डोकेदुखी? संबंध कसे असतील?

Gokul Dudh Politics : गोकुळ दूध संघात सत्ता महायुतीची; वर्चस्व मात्र हसन मुश्रीफ- सतेज पाटील यांचेच, महाडिक -मंत्री मुश्रीफ यांच्यात नवा वाद...

हा तर फक्त सामना! भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT