मुंबई

केवळ स्पर्शाने कोरोना होतो का ? तज्ज्ञ समितीने हायकोर्टात स्पष्ट केलं की... 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना बाधित असलेल्या रुग्णांना केवळ स्पर्श केल्यामुळे अन्य व्यक्तिंना कोरोना बाधा होत नाही, असे नागरी उड्डाण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने शुक्रवारी मुंबई हायकोर्टमध्ये स्पष्ट केले. 

कोरोना बाधित रुग्णांच्या खोकला किंवा शिंकण्यामुळे उडालेले थेंब किंवा तोंडातून बाहेर आलेले थेंब अन्य व्यक्तीच्या कपडे किंवा शरीरावर पडले आणि नाक, तोंड, डोळ्यातून ते त्यांच्या शरीरात गेले तर कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो, असे समितीने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे.  न्या. एस जे काथावाला आणि न्या एस पी तावडे यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ काॅन्फरन्सिंगमध्ये एअर इंडिया पायलट देवेन कनानी यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. 

विमान प्रवासात मधील सीट रिक्त न ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात कनानी यांनी याचिका केली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालात विमान प्रवासाबाबत सुरक्षा उपाय सुचविले आहेत. त्यानुसार शक्यतो मधली सीट रिकामी ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, जर अशी सीट भरली तर त्या सीटवर बसणार्या प्रवाशाला सुरक्षित गाऊन, फेसशिल्ड, तीन स्तरीय मास्क आदी सुरक्षा कवच असेल, असे सांगण्यात आले आहे. यावर, केवळ स्पर्श केल्यामुळे कोरोनाची बाधा होते का, असा प्रश्न मागील सुनावणीला न्यायालयाने उपस्थित केला होता. यावर आज समितीने अहवाल दाखल केला. 

कोरोना स्पर्श केल्यामुळे होत नाही मात्र कोरोना रुग्णांच्या खोकण्यातून आणि शिंकण्यामुळे उडालेले थेंब शरीरात जाऊन होऊ शकतो, असे स्पष्ट केले आहे. मात्र यावर पुरेशी काळजी घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. खंडपीठाने निकाल राखून ठेवला असून तोपर्यंत समितीच्या सुरक्षातत्वानुसार प्रवास सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मे अखेरीस समितीने सुरक्षितता तत्वे जाहीर केली आहेत.

is there any possibility of getting corona infection with touch report submitted in mumbai high court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''काहींना यात राजकारण करायचंय'', मराठा आरक्षणाच्या 'जीआर'वरुन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांचे कान टोचले

Latest Marathi News Updates Live : प्रतिज्ञापत्रावरुन मराठ्यांना ओबीसीत टाकता येणार नाही - छगन भुजबळ

Explained: लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास कोणती लक्षणे दिसतात अन् कोणते उपाय करावे? वाचा आयुर्वेद तज्ज्ञांचे मत

Nagpur News: नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने संपवले जीवन; मानसिक ताणाच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त

Income Tax Law: आता २० हजारांपेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार, आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही वाचलात का?

SCROLL FOR NEXT