मुंबई

डबेवाल्यांच्या लोकलप्रवासासाठी रेल्वेकडून अद्यापही अध्यादेश नाही; क्यूआर कोडची प्रतिक्षा

मिलिंद तांबे

मुंबई  : सरकारने डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिल्याने डबेवाल्यांची सेवा आजपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र डबेवाल्यांकडे क्युआर कोड नसल्याने त्यांना रेल्वेने प्रवास कऱण्यास मनाई कऱण्यात  आली आहे.  राज्य सरकारने तोंडी सांगितले असले तरी तसा अध्यादेश रेल्वे प्रशासनाने काढला नसल्याने क्युआर कोडची प्रतिक्षा करावी लागत आहे.  

क्युआर कोडची चौकशी करण्यासाठी “मुंबई डबेवाला असोशिएशन “ चे पदाधिकार शनिवारी मध्य रेल्वे कार्यालयात गेले असतां त्यांना तेथून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगण्यात आले. डबेवाल्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असतां, डबेवाल्यांना लोकलने प्रवास करू देण्याबाबतचा कोणताही अध्यादेश जारी झाला नसल्याचे रेल्वे कडून सांगण्यात आले. त्यामुळे डबेवाल्यांकडे क्युआर कोड नसल्याने त्यांना सध्या तरी सेवा सुरू करता आली नाही.

डबेवाले सोमवारी पुन्हा रेल्वे अधिकाऱ्यांकडे क्युआर कोडच्या चौकशीसाठी गेले. मात्र अद्याप अध्यादेश आला नसल्याचे रेल्वे अधिका-यांनी सांगितले. मात्र क्युआर कोड जरी मिळाला तरी त्यासाठी एँड्रॉईड फोनची आवश्यकता असते. ज्या डबेवाल्यांकडे ॲनड्रॉईड मोबाईल फोन आहेत त्यांना त्यांच्या मोबाईलवरून क्युआर काढता येणार आहे. मात्र बहूतांश डबेवाल्यांकडे साधे मोबाईल फोन आहेत. मोजक्याच डबेवाल्यांकडे ॲनड्रॉईड मोबईल फोन आहेत. त्यामुळे डबेवाल्यांना क्युआर कोड मिळवणे अवघड जाणार आहे.

डबेवाल्यांच्या या समसयेबाबत रेल्वे अधिका-यांशी चर्चा करण्यात आली. मात्र अध्यादेश आल्याखेरीज यावर तोडगा काढणे शक्य नसल्याचे रेल्वे अधिका-यांनी सांगितले. डबेवाल्यांकडे स्व:ताचे ओळखपत्र आहे ते ओळखपत्र प्रमाण मानून त्यांना लोकलने प्रवास करू देण्याची अनुमती द्यावी अशी विनंती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT