rapid test 
मुंबई

कोरोनाशी लढा ! राज्यात होणार इतक्या हजार 'रॅपिड' टेस्ट

सकाळवृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) निर्देशांनुसार केल्या जात आहेत. केंद्र सरकारने काही निकषांवर मान्यता दिल्यानुसार राज्यात 75 हजार "रॅपिड टेस्ट' केल्या जातील. मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राज्यातील कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्‍सिजन स्टेशन तयार करण्यावर भर देण्यात येत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी (ता. 20) सांगितले. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सायंकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारमार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती दिली. राज्यातील चाचण्यांची संख्या वाढत असल्याने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आयसीएमआरच्या सूचना कटाक्षाने पाळल्या जात आहेत. घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी 6359 पथके कार्यरत आहेत. 

कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्‍सिजन स्टेशन उभारण्यात येतील. प्रत्येक खाटेजवळ ऑक्‍सिजन मास्क आणि ऑक्‍सिजनचा पुरवठा व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या गरजेनुसार त्यांचा वापर केला जाईल. मेडिकल ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी होऊ नये अशा सूचना उत्पादकांना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. एक्‍स-रे, एसपीओटू पल्स ऑक्‍सिमीटर अशा काही छोट्या चाचण्या करण्यावर भर दिला जाणार आहे. एकूण 15 हून अधिक रुग्ण असलेला जिल्हा रेड झोन, 14 दिवसांत एकही नवा रुग्ण न आढळलेला जिल्हा ऑरेंज झोन आणि 28 दिवस नव्याने एकही रुग्ण न आढळलेला जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे.

हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीनचे वाटप 
हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीनमुळे प्रतिबंधात्मक शक्ती वाढते; म्हणून मुंबईतील काही भागांत या गोळ्यांच्या वाटपासाठी मान्यता देण्यात आली आहे. हृदयविकार किंवा 60 वर्षांवरील आणि 15 वर्षांखालील व्यक्तींना त्या दिल्या जाणार नाहीत. 

... तेव्हाच समाधान 
राज्यातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग सुरुवातीच्या दोन दिवसांवरून आता सुमारे सात दिवसांवर गेला आहे. हा दर 20 ते 25 दिवसांवर येईल, तेव्हा काहीशी समाधानाची बाब मानता येईल, असे राजेश टोपे म्हणाले.

 There will be thousand of rapid tests in the state

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ताडोबातील खाण प्रकल्पाला अखेर मंजुरी; राज्य वन्यजीव मंडळातील सदस्यांचा विरोध डावलत सरकारचा निर्णय...

Kolhapur : आईच्या शेवटच्या साडीने वाचले दीड लाख; सय्यद कुटुंबाची आयुष्याची पुंजी भस्मसात, दिवसभर कचऱ्यात राबणारे हात थरथरले

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर केला जाणार

Amravati fire: टर्पेंटाइन पॅकिंग उद्योगात आग; एक ठार, अमरावती एमआयडीसीमधील धक्कादायक घटना, मृत महिला वर्धेची!

Hinjewadi News : हिंजवडीत संगणक अभियंत्याने आईला मेसेज करून संपविले जीवन

SCROLL FOR NEXT