मुंबई

शाळांच्या फी वाढीबद्दल सरकारचा महत्त्वाचा निर्णय, पालकांना मिळणार मोठा दिलासा...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - येत्या ३ तारखेला देशव्यापी लॉक डाऊन संपणार आहे. पुढे गोष्टी कशा प्रकारे आकार घेणार याबाबत अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. अशात येत्या काळात भारतात मोठी आर्थिक मंदी देखील येणार असल्याचं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवर महिन्याचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. याला कारण म्हणजे पगारात होणारी कपात किंवा कोरोनामुळे गमवावी लागलेली नोकरी. अशातच नवीन शैक्षणिक वर्ष देखील सुरु होत असल्याने पालकांच्या मनात दरवर्षी वाढणारी फी कशी भरायची अशी चिंता होती. यावर शिक्षण विभागामार्फत मोठा निर्णय घेतला गेलाय.  

कोरोनाच्या संवेदनशील पार्श्वभूमीवर दरवर्षी वाढणाऱ्या फी वाढीबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलाय. यंदा राज्यातील कोणत्याच शाळेमध्ये फी वाढ होणार नाहीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री आणि अधिकारी यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मिटिंग पार पडली. या बैठकीत सर्व पालकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला गेलाय. याबाबतच्या सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतच्या सूचना सर्व शाळांना देखील दिल्या आहेत.

दरवर्षी शाळेच्या 'फी'मध्ये वाढ होत असते. अशात यंदा कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अशात फीवाढीची चिंता पालकांमध्ये होती. याच पार्श्वभूवर महाराष्ट्र सरकारकडून महत्त्वाचं निर्णय घेण्यात आलाय.    

there wont be fee hike in any of the schools of maharashtra says education minister varsha gaikwad

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rule Change 1 September: आजपासून बदलले 5 मोठे नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Maratha Reservation: मुंबईत मराठा कार्यकर्त्यांचा ओघ सुरुच; ऐरोलीत पोलिसांचा फौजफाटा तैनात

Devendra Fadnavis: कितीही शिव्या दिल्या तरी बाबासाहेबांच्या संविधानाच्या बाहेर जाणार नाही, फडणवीसांनी जरांगेंना ठणकावून सांगितलं

Live Breaking News Updates In Marathi: आमदार अभिजीत वंजारी यांच्या नाम फलकावर काळे फासले

Besan Modak Recipe: मोरश्वरासाठी सहाव्या दिवशी बनवा स्वादिष्ट बेसण मोदक, बाप्पा होतील प्रसन्न

SCROLL FOR NEXT