मुंबई

मंत्रिमंडळातलं नंबर दोनचं (गृहमंत्री) पद 'या' राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळणार?

अश्विनी जाधव-केदारे

विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील यासारख्या राजकीय शत्रूंना पराभूत करत पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा अजित पवारांनी रोवला. मात्र, पक्षाला इतकं जबरदस्त यश मिळवून देणाऱ्या अजित पवारांना राज्याचं गृहमंत्रिपद मिळणार का, हाच सवाल सध्या विचारला जातोय. त्याला कारणंही तशी आहेत. अजित पवार एक जबरदस्त प्रशासक असले तरी त्यांच्यावर असलेल्या आरोपांमुळे गृहमंत्रिपदाच्या वाटेत अनेक अडचणी येऊ शकतात. मात्र, तरीही त्यांना हे पद का मिळू शकतं, याची काही कारणं पाहूया.

  • आपले काका शरद पवारांप्रमाणे अजित पवार यांनाही महाराष्ट्राची सखोल जाण आहे
  • याशिवाय अजित पवार हे उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जातात
  • प्रशासनातील प्रत्येक गोष्टींची माहिती त्यांना आहे
  • त्यामुळे गृहमंत्रिपदी अजित पवारांना नेमून प्रशासनावर राष्ट्रवादीला आपली पक्की मांड ठोकता येईल

मात्र, अजित पवारांचे हेच उत्तम गुण कधीकधी त्यांच्यासाठी निगेटिव्ह ठरतात. सर्वांत पहिलं म्हणजे त्यांचा रोखठोक आणि फटकळ स्वभाव. त्यामुळे अनेकदा त्यांचा हेतू नसतानाही अनेक जण दुखावले जातात. याशिवाय अजित पवारांची जीभ घसरण्याच्या अनेक घटना घडल्यात. त्यामुळे वाद अजित पवारांना नवे नाहीत. त्यातच सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचं भूत काही केल्या त्यांचा पिच्छा सोडत नाही.


अजित पवारांना गृहमंत्रिपद नाही मिळालं तर राष्ट्रवादीतून दुसरं नाव समोर येतं ते म्हणजे जयंत पाटील यांचं.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे आहे 
  • या आधी जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळात वेगवेगळी पदं भूषवलीत
  • मुंबईवरच्या २6-11च्या हल्ल्यानंतर त्यांच्याकडे गृहमंत्रिपद आलं होतं

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याची केवळ औपचारिकता उरलीय. त्या पार्श्वभूमीवर आता मंत्रिमंडळातलं हे नंबर दोनचं पद कोणाला मिळणार, याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.

Webtitle : these two leaders of NCP may get home minister post in Maharashtra cabinet

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT