उल्हासनगर पोलिसांनी हस्तगत केेलेल्या दुचाकी 
मुंबई

केवळ अय्याशीसाठी 'ते' चोरायचे दुचाकी

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : दुचाकी चोरून आणि त्यांच्यावर बनावट नंबरप्लेट लावून केवळ मौजमजा करणाऱ्या दोघांचा उल्हासनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली. 

उल्हासनगर शहरात दुचाकी चोरण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहाय्यक पोलिस आयुक्त धुला टेळे यांनी या टोळीचा छळा लावण्याचे आदेश सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिले होते. त्यातच उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध प्रकटीकरण पथकाला एक अल्पवयीन मुलगा चोरीची दुचाकी वापरत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती.

त्यानुसार हवालदार श्‍याम सोनवणे, पोलिस नाईक सुजित निचिते, मिलिंद बोरसे, धनंजय सांगळे, पोलिस शिपाई अर्जुन मुत्तलगिरी, भरत पवार, वसंत डोळे यांनी सी ब्लॉक गुरुद्वारा येथे सापळा रचून अल्पवयीन मुलासह अरबाज ऊर्फ अरबु सयाउदद्दीन मिया याला अटक केली. 

त्यांच्याकडे मिळालेली दुचाकी ही उल्हासगनर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीअंती त्यांच्याकडून तब्बल 5 दुचाकी मिळून आल्या असून त्यांची किंमत दोन लाखाच्या घरात आहे. मौजमजा करण्यासाठी उभी असलेली दुचाकी चोरून आणि त्यावर बनावट नंबरप्लेट लावून फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT