मुंबई

...म्हणून महाडकरांचे टेन्शन वाढले 

सकाळ वृत्तसेवा

महाड : महाड तालुक्‍यात केवळ 15 दिवसांत कोरोनाची तिसरा रुग्ण आढल्याने शहर व ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्‍यातील कोकरे तर्फे नाते मोरेवाडी येथील एका 65 वर्षीय व्यक्तीची कोरोना टेस्ट आज पॉझिटीव्ह आली आहे. तालुक्‍यातील हा तिसरा पॉझिटीव्ह रुग्ण आहे. एका महिलेचा या पूर्वी मृत्यू झाला आहे. सरकारी यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचली असून हा परिसर कोरोनाबाधीत क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. 

हे वाचा : कॉंग्रेसच्या साहसवादाला विरोध 

महाड तालुक्‍यातील कोकरे तर्फे नाते गावातील 65 वर्षीय अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना माणगाव येथील एका खासगी रुग्णालयात 5 मे रोजी दाखल करण्यात आले होते. येथे त्यांना सुका खोकला, सर्दी अशी लक्षणे आढळून आल्याने त्यांची स्वॅब टेस्ट करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. दरम्यान या रुग्णाला या रुग्णालयातून 7 रोजी घरी सोडण्यात आले होते. आता कोरोना रिपोर्ट पॉंझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ सुरु झाली आहे. घरातून रुग्णालयात दाखल करणे, रुग्णालये व पुन्हा घरी अशा संपर्कात अनेक जण व रुग्णालय कर्मचारी आल्याने 

हे वाचा : नोकरी मिळत नाही...पण घाबरू नका... 

अनेकांची आता तपासणी करावी लागणार आहे. कोकरे मारे वाडी आणि परिसर आता सील करावा लागणार आहे. दरम्यान तालुका वैद्यकिय अधिकारी डॉं.एजाज बिरादार, सहा.गट विकास अधिकारी सुनील यमगर, विस्तार अधिकारी राहुल मिसाळ आणि व्हि.जी.वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या कोरोना रुग्णाला कस्तुरबा येथे पुढील उपचारासाठी रवाना केले जाणार आहे. महाड तालुक्‍यातील बिरवाडी, शेलटोली गावात व आता हा तिसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. याआधी बिरवाडी येथील महिलेचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला होता. तर एक परप्रांतिय कामगार रुग्णावर मुंबईत कोरोनावर उपचार सुरु आहेत. 
............................................. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT