Corona Updates
Corona Updates  sakal media
मुंबई

५९ दिवसांत १३०० वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू; दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : २३ महिन्यांत तिसऱ्यांदा सोमवारी (ता. ७) राज्यात कोरोनामुळे (corona patients) एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार १ एप्रिल २०२० नंतर प्रथमच राज्यात २ मार्च २०२२ रोजी कोरोनामुळे शून्य मृत्यूची (zero corona deaths) नोंद झाली; मात्र गेल्या दोन महिन्यात कोरोनामुळे १९५७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात सर्वाधिक मृत्यू पुरुषांचे असून ६१ ते ९० वयोगटातील १३०० ज्येष्ठांचा (senior citizen death) त्यात समावेश आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये १२९५ पुरुषांचा मृत्यू झाल्याची नोंद असून ६६२ महिलांना जीव गमवावा लागला आहे.

राज्यात दोन महिन्यांत तिसऱ्या लाटेत कोरोनाचे ११,४०,०५० रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये ६,५८,२८६ पुरुष आणि ४,८१,७६४ महिला होत्या. ओमिक्रॉनमुळे संसर्गजन्य बनलेली तिसरी लाट आता नियंत्रणात आहे. नव्या रुग्णांसह मृतांचा आकडाही आटोक्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेत संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, ताप आणि घसा खवखवणे अशी लक्षणे आढळून आली.

६६ टक्के मृत्यू वृद्धांचे

कोविड मृत्यू निरीक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, की जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ६६ टक्के वृद्धांचे होते. १९५७ पैकी ६१ ते ९० वयोगटातील १३०० जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमागे विषाणूचा कोणता प्रकार सर्वाधिक कारणीभूत होता हे अभ्यासानंतरच सांगता येईल; मात्र मृत्यू झालेल्या सर्वांना इतर आजारही होते.

दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू

कोविड मृत्यू निरीक्षण समितीनेही कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून झालेल्या मृत्यूंचे मूल्यांकन केले आहे. पहिल्या लाटेत १२ ते १८ सप्टेंबरदरम्यान ३,५६१ जणांचा मृत्यू झाला. १३ सप्टेंबरला एका दिवसात ५४० रुग्णांचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत २३ ते २९ एप्रिल २०२१ दरम्यान सर्वाधिक मृत्यू झाले. या एका आठवड्यात ९४४४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्याच आठवड्यात २६ एप्रिल रोजी एका दिवसात १,३९७ जणांचा मृत्यू झाला. तिसऱ्या लाटेत २४ जानेवारी २०२२ रोजी एका दिवसात ७६ जणांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT