lockdown violation 
मुंबई

लॉकडाऊनमध्ये राज्यात 96 हजार 231 गुन्ह्यांची नोंद; साडेतीन कोटींची दंडवसुली 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोव्हिड-19  संदर्भातील अत्यावश्यक सेवेसाठी तीन लाख 10 हजार 694 पास पोलिस विभागामार्फत देण्यात आले. या काळात राज्यात 96 हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊन म्हणजे 22 मार्च ते 6 मे या कालावधीत कलम 188 नुसार 96 हजार 231 गुन्हे नोंदवून 18 हजार 858 व्यक्तींना अटक करण्यात आली. वेगवेगळ्या गुन्ह्यांत 3 कोटी 56 लाख 81 हजार 994 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या काळात पोलिसांवरील हल्ल्यांच्या 189 घटना घडल्या. त्या प्रकरणांत 663 जणांना ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे.

अवैध वाहतूक प्रकरणांत 1281 वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 53 हजार 330 वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून झालेल्या व्हिसा उल्लंघनाचे 15 गुन्हे नोंदवण्यात आले. पोलिस विभागाचा 100 क्रमांकाचा दूरध्वनी सर्व जिल्ह्यांत 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या क्रमांकावर 85 हजार 309 दूरध्वनी आले. त्या सर्वांची योग्य दखल घेतल्याचे सांगण्यात आले.

समाजकंटकांवर कारवाई
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलिस, डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु, काही दुप्रवृत्ती त्यांच्यावर हल्ले करत आहेत. अशा हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस विभागाला देण्यात आले आहेत.

 पोलिस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांत मुंबईतील तीन, पुण्यातील एक, सोलापूर शहरातील एक अशा पाच पोलिसांना जीव गमवावा लागला. आतापर्यंत 43 पोलिस अधिकारी व 444 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत. कोरोनाची लक्षणे आढळलेल्या पोलिसांवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

रिलिफ कॅम्प
राज्यातील एकूण 4738 हजार रिलिफ कॅम्पमध्ये चार लाख 35 हजार 30  लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. हातावर विलगीकरणाचा शिक्का असलेल्या 649 व्यक्तींना पोलिसांनी शोधून विलगीकरण कक्षात पाठवले. राज्यात एकूण दोन लाख 24 हजार 219 व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT