तीन बांगलादेशी नागरिकांना घाटकोपरमधून अटक; एटीएसची कारवाई  
मुंबई

तीन बांगलादेशी नागरिकांना घाटकोपरमधून अटक; एटीएसची कारवाई

निलेश मोरे

घाटकोपर (बातमीदार) : घाटकोपरमधून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ही कारवाई केली असून, सद्दाम आबुल हुसैन (25), रमजान अली नजीर अली (23), इकबाल नूर हुसैन (23) अशी अटक करण्यात आलेल्या नागरिकांची नावे आहेत. 

"आईज ऍण्ड इयर' या गोपनीय सूत्रांकडून एटीएसला याबाबत माहिती मिळाली होती, की सद्‌भावना बिल्डिंग, वामन मास्तर वाडी, नित्यानंद नगर, घाटकोपर (पश्‍चिम) या भागात काही बांगलादेशी नागरिक येणार आहेत. त्याअनुषंगाने एटीएस अधिकारी रामकृष्ण बोडके यांनी आपल्या पथकासह सापळा लावून एका संशयित बांगलादेशी नागरिकास ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात नेत त्याची चौकशी करण्यात आली. या वेळी प्रथमत: त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याच्यावरील संशय बळावला. या वेळी पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता, त्यात काही बांगलादेशी कोड असलेले मोबाईल क्रमांक मिळाले. याबाबत सखोल चौकशी केली असता या व्यक्तीने तो बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्या दोघांनीही चौकशीत बांगलादेशी नागरिक असल्याचे मान्य केले. 

छुप्या मार्गाने भारतात प्रवेश 
कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय बेनापूर येथून बांगलादेश-भारत सीमेवरून छुप्या मार्गाने भारतात प्रवेश केला. त्यानंतर हावडा स्थानकावरून रेल्वेने प्रवास केला, अशी कबुलीही या तिघांनी दिली. घाटकोपर पोलिसांनी या तिघांविरोधात कलम- 3 सह 6, पारपत्र (भारतात प्रवेश) 1950, सह परकीय नागरिक आदेश 1948 सह कलम 14 भारतीय नागरिक कायदा 1946 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Germany Kebab Chaos : अवघ्या ९० रुपयांत कबाब खाण्यासाठी रस्त्यावर उतरली तुफान गर्दी; शहरात पेटला भडका, थेट हेलिकॉप्टर पाचारण!

कारगिलमध्ये दुकाने बंद, रस्त्यांवर शुकशुकाट! हिवाळी निवडणुका आणि मतदारसंघ पुनर्रचनेविरोधात नागरिकांचा बंद; पोलिस बंदोबस्तात वाढ

Latest Marathi News Live Update : यवतमाळात एसटी बसची सुरक्षा भिंतीला धडक

UCC Maharashtra News : महाराष्ट्रात समान नागरी कायद्यावरून नवा राजकीय वाद! बिगर हिंदूंवर ‘हिंदू नागरी संहिता’ लादण्याचा प्रयत्न असल्याचा ओवेसींचा आरोप; विधिमंडळात विरोध करणार

Arshdeep Singh ची आधी मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री अन् मग लगेचच उरकला साखरपुडा; कोण आहे जोडीदार? पाहा Photo

SCROLL FOR NEXT