मुंबई

'गुजरातच्या 'सिंहा'चे रक्षण महाराष्ट्राचा 'वाघ' करेल'

सकाळवृत्तसेवा

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात गुजरातहून सिंह तर औरंगाबादहून वाघ दाखल होणार आहे. प्राण्यांच्या आगमनाचा मुद्दा छेडत महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी आज गुजरातच्या 'सिंहा'चे रक्षण महाराष्ट्राचा 'वाघ' करेल असा असा उपरोधिक टोला लगावत भाजपवर निशाणा साधला. भाजप शिवसेनेने युती होईपर्यंत परस्परांवर टीकेची एकही संधी सोडत नव्हते. युती झाल्यानंतर दोन्ही पक्षात अजूूनही अलबेल नसल्याचे दिसत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही अजूनही काही अलबेल नसल्याचेच दिसून येत आहे. युतीनंतर शिवसेना आणि भाजप पुन्हा पालिकेत एकत्र होणार अशी चर्चा, पालिका वर्तुळात सुरू आहे. महापौर महाडेश्वर यांनी राणीबागेच्या विकासासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत भाजपा सहभागी होणार का, भाजपा पालिकेतील समित्यांचे अध्यक्षपद स्वीकारणार का? असा सवाल केला असता त्यावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यावेळी मुंबईत गुजरातचा सिंह आणला जाणार असून, त्याचे रक्षण महाराष्ट्राचा वाघ करेल, अशी टोलेबाजी त्यांनी केली. 

मुंबईकरांनी सलग पाचवेळा शिवसेनेवर विश्वास दाखवून महापालिकेची सत्ता दिली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही मुंबईच्या विकासाची कामे करत आहोत. शिवसेनेकडून मुंबईचा विकास केला जात आहे. मुंबईच्या विकासासाठी जे आमच्यासोबत येतील त्यांना सोबत घेऊन जाऊ. शिवसेना आणि भाजपा पालिकेची निवडणूक स्वबळावर लढले आहेत.

महापालिकेच्या निवडणूकांना अद्याप तीन वर्ष आहेत. पालिकेत भाजपाला सत्तेत सहभागी करायचे झाल्यास त्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे सांगत भाजपला सत्तेत सहभागी करण्याबाबत महापौर महाडेश्वर यांनी थेट उत्तर देणे टाळले. शिवसेना -भाजपची सद्या युती झाली असली तरी एकमेकांवरील कुरघोडी अद्याप संपलेल्या नाहीत, हे महापौरांच्या टोलेबाजीवरून दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT