मुंबई

टीएमटीच्या बस भाडेवाढीच्या दिशेने 

राजेश मोरे

ठाणे : ठाणे पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बसमधून (टीएमटी) प्रवाशांना आकारण्यात येणाऱ्या तिकिटातून अपेक्षित उत्पन्न उपलब्ध होत नाही. त्यामुळे तिकीट दरात वीस टक्के वाढीचा प्रस्ताव टीएमटी प्रशासनाने तयार केला आहे. विशेष म्हणजे एक वर्षापूर्वी टीएमटीच्या दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला होता. पण त्यावेळी निवडणुकीचे वारे वाहत असल्याने ही दरवाढ फेटाळण्यात आली होती. यंदा या दरवाढीबाबत सत्ताधारी शिवसेना काय भूमिका घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

ठाणेकरांवर पाणी दरवाढीचा बोजा

डिझेल आणि सीएनजीचे दर सातत्याने वाढत आहेत. परिवहन सेवेच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे सातत्याने होणारा दुरुस्तीवरील खर्च, जीएसटीमुळे वाहनांच्या किमतीत झालेली वाढ आणि शहरातील वाहतूक कोंडीमुळे टीएमटीचा तोटा दरवर्षी वाढतो आहे. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी टीएमटी प्रशासनाने तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार किमान 2 रुपये ते 12 रुपयापर्यंतची कमाल वाढ सूचविण्यात आली आहे. 

टीएमटीच्या जुन्या बसमुळे इंधनाचा जास्तीचा वापर होत असताना, शहरात सर्वत्र मेट्रोचे काम सुरू असल्याने ही वाहतूक कोंडी पुढील सुमारे दोन वर्षे कायम राहणार आहे. या सर्व घटकांमुळे परिवहन सेवेची दैनंदिन उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ घालणे जिकरीचे झाले आहे.

ही तूट भरून काढण्यासाठी इतर उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध करण्याबरोबरच वीस टक्के भाडेवाढ सूचविण्यात आली आहे. गेल्या वर्षी लोकसभा, विधानसभा निवडणुका असल्यामुळेच ही दरवाढ फेटाळण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना या दरवाढीला कितपत पाठिंबा देणार, याबाबत सांशकता आहे. 

अशी असेल भाडेवाढ 

तिकीट दरात 20 टक्के भाडेवाढ याप्रमाणे दररोज 3 लाख 40 हजार उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे वर्षाला 9 कोटी 35 लाख उत्पन्न परिवहनला मिळेल. या भाडेवाढीनुसार किमान 7 रुपये असणारे भाडे 9 रुपये होणार आहे. तर पुढील प्रत्येक टप्यासाठी 2 रुपयांनी भाडेवाढ असणार आहे. ही भाडेवाढ कमाल 12 रुपयांपर्यंत जाणार आहे. वातानुकूलित बससाठी 12 रुपये दरवाढ सूचवण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यासाठी असणारे 36 रुपयांचे भाडे 48 रुपयांपर्यंत जाणार आहे. 

तरण तलावांच्या शुल्कातही 20 टक्‍यांची वाढ 

  • ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता तरण तलावांच्या शुल्कातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पालिकेच्या मालकीच्या असलेल्या मारोतराव शिंदे आणि यशवंत रामा साळवी तरण तलावाच्या शुल्कात 10 ते 20 टक्के वाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
  • हा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलावासाठी सध्या 5 ते 15 वर्षे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक सभासद फी 4370 रुपये आहे. तर 15 वर्षावरील पुरष व महिलांसाठी 7 हजार 50 रुपये एवढी आहे.
  • तर कै. यशवंत रामा साळवी तरण तलावासाठी सध्या 5 ते 15 वर्षे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक सभासद फी 5 हजार 120 रुपये आहे. तर 15 वर्षावरील पुरुष व महिलांसाठी 8 हजार 340 आकारले जात आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT