mumbai high court sakal media
मुंबई

सीसीटीव्ही लावण्याच्या मुद्द्यावरून पोलिसांवर मुंबई हायकोर्टाची नाराजी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme court) निर्देश असूनही राज्य सरकारने (Maharashtra government) राज्यातील पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याबाबत कोणतेही ठोस काम केलेले नाही, अशी स्पष्ट नाराजी आज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) व्यक्त केली. सीसीटीव्हीचे (cctv) कंत्राट देण्यासंबंधित सर्व कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले.

सर्वोच्च न्यायालयाने २०२० मध्ये दिलेल्या आदेशात सर्व पोलिस ठाण्यांत आणि कोठडीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक केले आहे. पोलिस ठाण्यातील कारभारात पारदर्शकता असावी, अशा उद्देशाने हा निर्णय देण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रात दोन वर्षांत त्या निर्णयाची गांभीर्याने अंमलबजावणी झालेली नाही, अशी टीका न्या. एस. जे. काथावाला आणि न्या. एम. एन. जाधव यांच्या खंडपीठाने आज केली. त्याबाबत राज्य सरकारने समिती नेमून चौकशी करायला हवी, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

राज्य सरकारने कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी दोन कंत्राटदार नियुक्त केले आहेत, असे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले. त्याबाबत एक प्रतिज्ञापत्रही न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार १०८९ पैकी ५४७ पोलिस ठाण्यांत ६०९२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यांपैकी ५,६३९ कॅमेरे सुरू आहेत. अन्य बंद आहेत. येत्या १५ दिवसांत ते दुरुस्त करण्याचे निर्देश राज्य सरकारने कंत्राटदारांना दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले. न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच सरकार काम का करते. त्यापूर्वी का नाही करत? केवळ दोनच कंत्राटदारांना निविदा का दिल्या? असे प्रश्न खंडपीठाने उपस्थित केले.

नोव्हेंबर २०२० मध्ये २२ आठवड्यांत सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्याचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, नंतर कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने काम बंद झाले. त्यामुळे पैसे थांबवले होते. आता चालू वर्षी जानेवारीमध्ये पुन्हा काम सुरू झाले, असे महाधिवक्त्यांनी सांगितले. खंडपीठाने त्याबाबत सर्व तपशील आणि कंत्राटदारांच्या अनुभवाबाबत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले असून सुनावणी २ मार्चपर्यंत तहकूब केली.

जाणीवपूर्वक फुटेज देत नाहीत!
एखाद्या प्रकरणात पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात येते तेव्हा ते काही तरी कारणे देऊन टाळतात. त्याबाबत स्पष्टच म्हणायचे, तर पोलिस जाणीवपूर्वक असे फुटेज देत नाहीत, असे खडे बोल खंडपीठाने सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Crime: सातबाऱ्यावर नाव नोंदविण्यासाठी लाच मागितली; महिला ग्राममहसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, एसीबीची कऱ्हाडमध्ये कारवाई

Quick Morning Breakfast Recipe: रात्रीचं वरण शिल्लक राहिलंय? मग सकाळच्या नाश्त्याला त्याचे असे टेस्टी पराठे नक्की बनवा

आजचे राशिभविष्य - 04 जून 2026

प्रवेशाची वेळ जवळ, पण...! सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास ‘एआयसीटीई’ची मिळेना मान्यता; ‘बाटू’कडील संलग्नीकरणावरही निर्णय नाही

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT