raigad police google
मुंबई

गुन्ह्यांची उकल करण्यास रायगड अव्वल

CD

अलिबाग : रायगड जिल्ह्यात २०२१ मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात रायगड पोलिसांना (Raigad police) मोठे यश आले आहे. चोरी, घरफोडी, जबरी चोरीसारख्या सुमारे दोन हजार २५४ गुन्ह्यांपैकी (Robbery crime) दोन हजार ३१ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. प्रलंबित प्रमाण हे फक्त दहा टक्के आहे. कोकण परिक्षेत्रात ही कामगिरी सर्वोत्तम आहे, असा दावा रायगडचे पोलिस अधीक्षक अशोक दुधे (Ashok dudhe) यांनी केला. रायगड पोलिस दलाचा वार्षिक आढावा बुधवारी घेण्यात आला. (Raigad police is on top in crime cases solving)

या वेळी अपर अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दयानंद गावडे आदी उपस्थित होते. दुधे यांनी सांगितले की, वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकांद्वारे वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात चोरी, खून, जबरी चोरीसारखे दोन हजार २५४ दाखल गुन्ह्यांपैकी दोन हजार ३१ गुन्ह्यांची उकल करण्यास यश आले.

जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यांवर रायगड पोलिसांनी वर्षभरात १५३ ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये एक कोटी, ३७ लाख ३८ हजार ८४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदा दारू विक्री वाहतूक, निर्मिती करणाऱ्या ४३७ ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत ५२ लाख, २६ हजार ४६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीकडून वाहने खरेदीसाठी एक कोटी, २६ लाख २३१ रुपयांचा निधी मिळाला. या निधीतून १४ जीप व दहा दुचाकी वाहने खरेदी करण्यात आली.

जिल्ह्यातून तीन गुन्हेगारी टोळ्या, नऊ जणांना महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५, ५६, ५७ नुसार हद्दपार केले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडविणारे, समाजात कलह निर्माण करणाऱ्या पाच हजार २४९ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती दुधे यांनी दिली. १० बंदुका जप्त अमली पदार्थ, अवैध बंदूक, दारूगोळा बाळगल्याप्रकरणी ४२ ठिकाणी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १० बंदुका जप्त केल्या असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

SCROLL FOR NEXT