Electricity Power supply off
Electricity Power supply off sakal media
मुंबई

रायगडमध्ये १७२ कोटी रुपयांची थकबाकी; अनेकांचा वीज पुरवठा खंडीत

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : महावितरणचे रायगड जिल्ह्यातील (Raigad) दोन लाख २६ हजार २९९ ग्राहकांकडे तब्बल १७२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या वसुलीसाठी महावितरण कंपनीने (MSEB) जिल्ह्यात जोरदार मोहीम सुरू केली आहे. कारवाईनुसार अनेकांचा (electric power off) वीज पुरवठाही खंडित करण्यात येतो. वीज बिल भरणे (electricity bill dues) सोयीचे व्हावे यासाठी महावितरण कंपनीने बॅंकासह पतसंस्थांकडे वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध केली. गुगल पे, फोन पे आदी आधुनिक सुविधाही आहेत. त्यानंतरही वीज बिले भरण्यास टाळाटाळ होते. या प्रकारामुळे दिवसेंदिवस थकबाकी वाढत आहे. रायगड जिल्ह्यातील दोन लाख २६ हजार २९९ ग्राहकांकडे महावितरणची सुमारे १७२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ग्राहक वीज बिले वेळेवर भरत नसल्याने महावितरण कंपनी आर्थिक संकटात (Financial crisis) सापडली आहे.

महाविरणच्या थकबाकीवर दृष्टिक्षेप

ग्राहक प्रकार - थकबाकीदार - रक्कम
घरगुती - १ ९१ ६५५ - १४६४०००००
वाणिज्य - १७३९१ - ४ ५२ ०००००
औद्योगिक - १४२८ - १५०००००
शेती पंप - ८७०२ - १२५०००००
पथदिवे - २ ८६२ - १४४ कोटी रुपये
पाणी पुरवठा - १३९४ - ४ ४३०००००

महावितरण कंपनी आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. वरिष्ठ पातळीवर वीज बिल वसुली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी वसुलीचे काम सुरू आहे. थकबाकीदारांनी तातडीने वीज बिल भरून सहकार्य करावे. अन्यथा वीजपुरवठा खंडित केला जाण्याची शक्यता आहे.
- आय. ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता, महावितरण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT