Raigad strike sakal media
मुंबई

अलिबाग: शासकीय कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप सुरू; ४० हजारपेक्षा अधिक कर्मचारी सहभागी

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर (Government Authorities) कर्मचारी समन्वय समितीतर्फे राज्यभर दोन दिवसांचा लाक्षणिक संप (Strike in alibag) बुधवार (ता. २३) पासून सुरू झाला. रायगड (Raigad) जिल्ह्यात संपाच्या पहिल्या दिवशी बुधवारी चांगला प्रतिसाद मिळाला. समन्वय समिती अध्यक्ष सुरेश पालकर (Suresh palkar) आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप नागे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर (dr mahendra kalyankar) यांना निवेदन दिले. संपात ४० हजारपेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत.

सर्वांना जुनी पेन्शन मंजूर करण्याबाबत केंद्र व राज्य शासन गंभीर नाही. नवीन अंशदायी पेन्शन योजना ही अत्यंत धोकादायक आहे. म्हणूनच पीडीआरडीए कायदा रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी देश पातळीवर आंदोलन उभारण्यात आले आहे. राज्य सरकारनेसुद्धा राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील साधारण ४० कर्मचारी व शिक्षक दोन दिवसांचा लाक्षणिक संपावर आहेत.

जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. शासनाने आरोग्य विभागासह सर्वच विभागांत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेतले आहेत. कंत्राटी कर्मचारी अत्यंत तुटपुंजा मानधनावर वर्षानुवर्षे सरकारची सेवा करीत आहेत; परंतु त्यांच्या सेवा नियमित केल्या जात नाहीत. हा सामाजिक भेदभाव आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‍नियमित सेवेत घेण्यासंदर्भात सातत्याने संघटनेच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे; मात्र, कामगार कर्मचाऱ्यांच्या समान काम समान वेतन या मूलभूत अधिकारांविरोधात शासनाचे धोरण आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी समन्वय समिती अध्यक्ष सुरेश पालकर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, कोषाध्यक्ष दर्शना पाटील, प्रफुल्ल कानिटकर, लता भोजने, संतोष म्हात्रे, नीला देसाई, प्रणाली म्हात्रे उपस्थित होते.


सरकारी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधित संवर्ग संघटनेच्या प्रतिनिधींसोबत निर्णायक चर्चा करा, यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संपात जिल्ह्यातील ४० हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत.

- प्रभाकर नाईक, सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT