women's day special  sakal media
मुंबई

हरणार नाही... खचणार नाही...; गृहउद्योगात महिलांची भरारी

सकाळ वृत्तसेवा

पाली : औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रात (industrial and tourism sector) रायगड जिल्हा आघाडीवर (raigad) असला तरी जिल्ह्यातील मोठा भाग हा डोंगरदऱ्या आणि दुर्गम आहे. त्यानंतरही येथील महिला पुरुषांच्या बरोबरीने (Women's power) खांद्याला खांदा लावून पुढे येत आहेत. काही महिलांच्या हाती दमडी नसतानाही त्यांनी गृहउद्योगात (home base business) मोठे नाव कमावले; तर काही जणी स्त्रियांच्या उद्धारासाठी प्रबोधन करत आहेत.

गृह उद्योगात मोठे नाव

पालीतील धनश्री गोळे यांनी २००५ मध्ये छोटा व्यवसाय करण्याचे धाडस केले. सुरुवातीला त्यांनी अवघे ४० पापड तयार करून ते बल्लाळेश्वर मंदिराजवळ दुकानदाराला विकले. त्यानंतर टप्प्याटप्याने त्यांनी व्यवसाय वृद्धी केली. आता त्यांचे पापड परदेशात विकले जातात.
पापड व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांनी सोबतीला एक-दोन महिलांची मदत घेतली. त्यानंतर काही वर्षांत साच्याच्या मदतीने पापड बनविण्यास सुरुवात केली. व्यवसायात चांगला जम बसला, उलाढाल चांगली होऊ लागली. २०१४ मध्ये त्यांनी पापडाची छोटी मशिन घेतली.

याच काळात त्यांनी संचिता गृहउद्योग स्थापन केला. सध्या चार लाखांहून अधिक किमतीच्या वेगवेगळ्या मशिन आहेत. याद्वारे महिन्याला जवळपास ५०० किलोपेक्षा अधिक पापड आणि ३०० ते ४०० किलो कुरड्या, चिकोड्या, शेवया आदी मिळून महिन्याला एक हजार किलोचा माल तयार होतो. उत्पादन खर्च व पगार जाऊन महिन्याला ७० हजारांचा निव्वळ नफा होतो.

एकपात्री प्रयोगातून जनजागृती

आपल्या सकस आणि दर्जेदार अभिनयाने ‘व्हयं मी सावित्रीबाई बोलतेय..!’ या एकपात्री प्रयोगातून मागील सहा वर्षांपासून जनजागृती व स्त्री शिक्षणाचे काम रोहा तालुक्यातील तळवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सोनल पाटील या करत आहेत. आपल्या कामाची जबाबदारी सांभाळून ते देखील कोणतेही शुल्क किंवा मानधन न स्वीकारता सोनल पाटील हे समाजप्रबोधन करत आहेत. तब्बल १२ भूमिका प्रभावी संवाद व अभिनयासह करतात.

त्या काळातील अनेक संदर्भ व घटना या काळाशी जुळवतात. जसे ज्योतिबा व सावित्रीमाईंनी सुरू केलेली सत्यशोधक लग्नाची पद्धत सध्या कशी लागू पडू शकते हे त्या सांगतात. कोरोना व लॉकडाऊनमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडला आहे. त्यामुळे मुलींना शिक्षणात आणण्यासाठी तसेच बालविवाह रोखण्यासाठी वाडीवस्तीवर जाऊन पालकांचे प्रबोधन व मुलींना शिकवित देखील आहेत. आत्तापर्यंत त्यांनी ४० पेक्षा अधिक प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात केले आहेत.

लेकरांच्या शिक्षणासाठी अशिक्षित आईचा त्याग

माणगाव तालुक्यातील पाटणूस आदिवासीवाडी येथील अत्यंत गरिबीत जगणाऱ्या जय जगताप व त्याच्या आदर्श व संघर्ष या दोन भावांच्या शिक्षणासाठी त्यांची आई आरती जगताप यांनी अनेक त्याग केले आहेत. आपण मोलमजुरी करून आयुष्य जगतोय. मात्र आपल्या मुलांच्या वाट्याला हा संघर्ष येऊ नये यासाठी मुलांना शिकवीत आहेत. जय हा आरती यांचा मोठा मुलगा. त्याने सांगितले की खाण्यासाठी काही नव्हते, पण आई मुलांचे पोट भरण्यासाठी व शिक्षणासाठी वडिलांच्या जोडीला काबाडकष्ट करत आहे. जयची दहावी झाल्यावर त्याने पुढे न शिकता काम करावे असे घरातील मंडळी सांगत होते. मात्र आरती यांनी घरच्यांचा विरोध पत्करून जयला पुढे शिकविले. बारावी बोर्डाच्या परीक्षेची फी देखील स्वतः भरली. आरती यांच्या पतीला पुण्याला चांगले काम मिळाले होते. मात्र मुलांचे शिक्षण अपुरे राहू नये यासाठी त्यांनी आपल्या पतीला येथेच थांबविले. आणि मोलमजुरी करून घराचा बोजा स्वतः देखील उचलला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT