रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा
मुंबई : वर्ष २०२०... भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव (corona infection) वाढला आणि संपूर्ण देशात टाळेबंदी (lockdown) लागू झाली. या टाळेबंदीने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले तर अनेकांच्या आयुष्याला कलाटणीही मिळाली. अनेकांनी कोरोना, टाळेबंदीत सर्वस्व गमावलं; तर अनेकांच्या आयुष्याला (people lost everything in corona pandemic) नवीन ध्येय आणि दिशाही मिळाली. मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात निरीक्षक असलेले सुधीर कुडाळकर (Sudhir kudalkar) हे अशाच काही व्यक्तींपैकी एक आहेत, ज्यांच्या टाळेबंदी काळातील ‘प्राणिप्रेमा’ची (Animal Activist) सर्वांना ओळख झाली. (Animal Activist police inspector sudhir kudalkar)
ती इतकी की सुधीर कुडाळकर हे नाव मुंबईतील प्राणिप्रेमींच्या स्पीड डायलवर सध्या आले आहे. ‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’ हा शेर कुडाळकर यांच्या कार्यास तंतोतंत लागू पडतो. टाळेबंदीमध्ये प्राण्यांचे सर्वाधिक हाल झाले. एरव्ही गजबजलेले रस्ते, चौक तेथील खाद्यपदार्थांची तसेच इतर दुकाने, तेथे येणारे चाकरमानी सर्वांना एका क्षणात ब्रेक लागल्याने खाण्याची चंगळ असलेल्या प्राण्यांची मोठी अवहेलना झाली. रस्त्यांवर साधे चिटपाखरूही दिसेनासे झाल्याने या प्राण्यांना पाण्यासाठीही वणवण करावी लागली. भटके कुत्रे आणि मांजरे यांना खायला मिळणे बंद झाले.
अनेक गृहसंकुलांनी प्राण्यांना हाकलून दिले. त्यात नेहमी प्राण्यांना खायला देणाऱ्यांचेही घराबाहेर पडणे कठीण होते. पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या ‘प्राणिमित्र’ असलेल्या काही मित्रांनी त्यांच्याकडे मदत मागितली. किमान जे कुत्रे एखाद्या सोसायटीत राहतात, त्यांना तेथून बाहेर काढण्यात येऊ नये, असा आग्रह अनेकांनी धरला. सुधीर कुडाळकर यांनी संबंधित गृहसंकुलांच्या चेअरमनशी बोलून ते कसे चुकीचे वागतात हे पटवून दिले आणि अनेक प्राण्यांचे रस्त्यावर येणे त्यामुळे बंद झाले. त्यानंतर कुडाळकर यांना असे अनेक मदतीचे फोन येऊ लागले.
कुडाळकर हे पार्ल्यात राहतात. तेथील प्राण्यांना मदत करण्यासाठी त्यांनी २४ सप्टेंबर २०२० ला व्हॉट्सॲपवर ‘पार्ला ॲनिमल लव्हर’ (पीएएल-पाल) नावाचा समूह तयार केला. यामार्फत पार्ल्यातील अनेक प्राणिप्रेमी त्यांच्याशी जोडले गेले. एका व्हॉट्सॲप ग्रुपपासून सुरू झालेला ‘पाल’चा हा प्रवास आता २६ ग्रुप्सवर येऊन पोहोचला आहे. मुंबईतील विविध ठिकाणी ‘पाल’चे २६ ग्रुप सध्या कार्यरत आहेत. ग्रुपची संख्या वाढायला लागली, तेव्हा कुडाळकर यांनी ‘पार्ला ॲनिमल लव्हर’चे नाव बदलून ‘प्युअर ॲनिमल लव्हर’ असे केले. ‘पाल’च्या प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये किमान २५० सदस्य आहेत. त्यातूनच जवळपास साडेसहा हजार सदस्य ‘पाल’शी जोडले गेले आहेत.
नुकताच ‘पाल’ने पहिला वाढदिवस साजरा केला. यावेळी वर्षभर चांगले काम करणाऱ्या प्राणिमित्रांचा सत्कार करण्यात आला. कायदेशीर सल्लागार प्राण्यांसाठी काम करताना अनेकदा कायदेशीर लढाई लढाव्या लागतात. म्हणूनच ‘पाल’ने नुकताच त्यांची स्वत:चीच एक कायदेशीर सल्लागार अर्थात ‘लिगल टीम’ तयार केली आहे. यात अनेक नामवंत वकिलांचा समावेश आहे. ज्या गृहनिर्माण संकुलांमध्ये प्राण्यांना ठेवण्यास नकार दिला जातो, संकुलाच्या आवारात त्यांना खायला द्यायला परवानगी दिली जात नाही, अशा संकुलांना ‘पाल’ची लिगल टीम नोटीस पाठवते.
तरीही बेकायदेशीर वागणे बंद केले नाही तर पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही सांगितले जाते. मुंबईत या टीमने आतापर्यंत जवळपास १७५ गृहसंकुलांना नोटिसा पाठवल्या आहेत. मुंबईबाहेरही सेवा ‘पाल’च्या कामाची कीर्ती मुंबईबाहेरही पसरू लागली. टाळेबंदी काळात शिर्डीहून प्राण्यांच्या मदतीसाठी हाक आली. याची दखल घेत ‘पाल’ने तेथील जवळपास १८०० ते २००० भटक्या कुत्र्यांच्या खाण्याची सोय केली. ही सेवा अजूनही सुरूच आहे. ‘पाल’च्या माध्यमातून शिर्डीत दर महिन्याला जवळपास ४५ हजार रुपये दिले जातात.
हे पैसे पालच्या व्हॉट्सॲप ग्रुपचे सदस्य उभे राहतात. तसेच कोकणात आलेल्या पुराच्या वेळीही ‘पाल’ने तेथील कुत्रे, मांजरांसाठी जेवण आणि निवाऱ्याची व्यवस्था केली. मदत, ताबा अन् निवाराही भटक्या कुत्र्या-मांजरांप्रमाणेच घरातल्याही अनेक कुत्री किंवा माजरांना मदतीची गरज असते. त्यांचे मालक त्यांच्यावर विविध प्रकारे अत्याचार करतात. अशा प्राण्यांनाही ‘पाल’तर्फे मदत केली जाते. याबाबत मालकांना समज दिली जाते; परंतु सुधारणा न झाल्यास त्या प्राण्याला ताब्यात घेऊन मालकाविरोधात कायदेशीर कारवाई केली जाते.
या प्राण्यांवर आवश्यकतेनुसार उपचारही केले जातात. काही प्राण्यांना निवारा उपलब्ध करून दिला जातो. आतापर्यंत असे १६ अंध कुत्रे, ४ अर्धांगवायू ग्रस्त कुत्रे आणि ४ वृद्ध कुत्रे, तसेच ६ अंध मांजरी यांना ‘पाल’ने निवारा उपलब्ध करून दिला आहे. पैशांची अशी होते ‘जमवाजमव’ प्राण्यांसाठी काम करताना पैसाही खर्च होतो. एखाद्या जखमी प्राण्याला उपचाराची गरज असते तेव्हा ‘पाल’ग्रुपमधून निधी जमवला जातो. जेवढा खर्च आहे, तो सर्व ग्रुपवर टाकतो. त्याद्वारे सदस्यांना पैसे जमा करण्याचे आवाहन करतो. यात कुणावरही सक्ती नसते किंवा कुणी किती पैसे द्यायचे असेही सांगत नाही. हवी असलेली उपचाराची रक्कम जमल्यानंतर ग्रुपवर तसे सांगितलेही जाते.
पारदर्शकता रहावी यासाठी कोणीकोणी पैसे दिले, त्यांची नावे जाहीर करतो आणि झालेल्या खर्चाचा हिशेबही दिला जातो. त्यामुळे पैसे योग्य ठिकाणी खर्च झाले, असा विश्वास पैसे देणाऱ्यांमध्ये बसतो, असे कुडाळकर यांनी सांगितले. नसबंदीचे ‘लक्ष्य’ भटक्या कुत्र्यांची नसबंदी हे पुढचे ध्येय असल्याचे सुधीर कुडाळर सांगतात. त्यांच्या टीमने आतापर्यंत अनेक कुत्रे आणि मांजरांची नसबंदी स्वखर्चाने केली आहे; परंतु भटक्या प्राण्यांची संख्या पाहता त्यांची नसबंदी स्वखर्चाने करणे शक्य नाही. मुंबई पालिका कुत्र्यांची नसबंदी करते, पण मांजरांचीही नसबंदी करणे तितकेच महत्त्वाचे असल्याने पालिकेने मांजरांची नसबंदी मोफत करून द्यावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कुडाळकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.