मुंबई

पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत

CD
पोलिसांचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत पाच परिमंडळांमध्ये अडीच हजार कॅमेरे बसवण्याचा आहे प्रस्ताव सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ५ ः ठाणे शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नगरसेवक निधी आणि स्मार्ट सिटीच्या योजनेतून शहरात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त नसल्याचा अहवाल ठाणे पोलिसांनी दिला आहे. दुसरीकडे पोलिस प्रशासनाचेच कोट्यवधींचे सीसीटीव्ही बसवण्याचे प्रस्ताव लालफितीत अडकले आहेत. वाहतूक पोलिसांनी तब्बल आठ ते नऊ महिन्यांपूर्वी शहरात १४८ कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव तयार केला होता; मात्र अद्याप हा प्रस्ताव मार्गी लागलेला नाही. दुसरीकडे संपूर्ण ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत पाच परिमंडळांमध्ये विविध ठिकाणी तब्बल दोन हजार ५०० कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता; मात्र अद्यापही या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने हा प्रस्तावदेखील मार्गी लागलेला नाही. कॅमेरे बसवण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाच्या निधीमधून पाच लाख रुपये खर्च करण्यात आले होते; मात्र या ठिकाणी आता नवीन कॅमेरे बसवण्यात येणार असल्याने नगरसेवकांचा कोट्यवधींचा निधी पाण्यात गेला आहे. वाहतूक पोलिसांच्या वतीने मार्च २०२१ रोजी शहरात विविध ठिकाणी १४८ कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यतादेखील मिळाली आहे. विशेष म्हणजे यासाठी लागणारा २.५ कोटींचा निधीदेखील वाहतूक शाखेकडे वर्ग झाला. तरीही हा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. दरम्यान, ठाणे शहराच्या अंतर्गत येत असलेल्या परिमंडळ १ आणि ५ मध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. संपूर्ण परिसराचा सर्व्हे करून कोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवता येतील याची यादी तयार करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून हा प्रस्तावदेखील शासनाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार तब्बल २५०० पेक्षा अधिक कॅमेरे विविध ठिकाणी बसवण्यात येणार आहेत; मात्र अद्याप हे दोन्ही प्रस्ताव लालफितीत अडकले आहेत. … कोट ‘‘ठाणे शहरात १४८ कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून यामध्ये काही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. शासनाकडून प्रस्ताव मान्य झाल्यानंतर याच्या निविदा काढण्यात येणार असून लवकरच हा प्रस्ताव मार्गी लागेल.’’ - बाळासाहेब पाटील, पोलिस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT