Metro
Metro sakal media
मुंबई

नवी मुंबई मेट्रोच्या कामाला गती; नगरविकास मंत्र्यांच्या महामेट्रोला सूचना

CD

खारघर : नवी मुंबई मेट्रो (Navi Mumbai metro) डिसेंबरमध्ये सुरू होणार असल्याचे सिडकोकडून (cidco) सांगण्यात आले होते. मात्र अद्याप पेठपाडा, अमनदूत, आणि पेंधर या स्थानकांचे काम पूर्ण झालेले नाही. नुकतीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मेट्रोच्या संथ गतीने सुरू असलेल्‍या कामावर नाराजी व्यक्त केल्यानंतर महामेट्रोने कामाला गती दिली आहे. (Eknath shinde gives order to speed up navi mumbai metro work)

महिनाअखेर काम पूर्ण करण्यात यावे अशा सूचना संबंधित एजन्सीला देण्यात आले आहे. सिडकोच्या नवी मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या मेट्रोच्या कामाला मे २०११ मध्ये सुरुवात झाली. बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटर अंतरावर सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प डिसेंबर २०१४ मध्ये पूर्णत्वाला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र कंत्राटदारांच्या आर्थिक दिवाळखोरीमुळे प्रकल्‍पास सात वर्षे विलंब झाला.

नवी मुंबई मेट्रोच्या कामाचा खोळंबा झाल्यामुळे सिडकोवर चोहोबाजूंनी टीका होवू लागल्याने गतवर्षी महामेट्रोकडे हे काम सोपविण्यात आले. महामेट्रोने सेन्ट्रल पार्क ते पेंधर स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅक, सिग्नल यंत्रणा, विद्युतीकरण, सिग्नल यंत्रणा व इतर कामे पूर्ण करून ऑगष्ट महिन्यात पेंधर ते सेंट्रल पार्क या ५.१४ किलोमीटर लांबीच्या मार्गावर रिसर्च डिझाइन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनचे (आरएसडीओ) सह व्यवस्थापकीय संचालक अनंत तिवारी आणि त्यांच्या आधिपत्याखाली अरविंद कुमार सिन्हा, राम आशिष सिंग, संजीवकुमार चव्हाण आदित्य गुप्ता आणि पी के सिंग आदी अभियंतांनी दहा दिवस मेट्रोची चाचणी झाल्यावर भारतीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून प्रमाणपत्र प्राप्त होताच डिसेंबरअखेर नवी मुंबई मेट्रो धावेल, असे सांगितले. मात्र पेठपाडा, अमनदूत, आणि पेंधर या स्थानकाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.

महिनाभरात काम पूर्ण होणार! पेठपाडा, अमनदूत, आणि पेंधर या तीनही स्थानकावर चढ उतार करण्यासाठी पायऱ्या तसेच रस्त्याचे काम अपूर्ण आहे. वाहनतळाचे काम अपूर्ण आहे मात्र सरकते जिन्याचे काम अपूर्ण आहे. तीन जानेवारीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली असता, संथगतीने सुरू असलेल्‍या कामाविषयी नाराजी व्यक्त केली. जानेवारी महिन्यात काम पूर्ण करून मेट्रो सुरू करावी, अशी सूचना शिंदे यांनी दिल्यावर महामेट्रोने कामाला गती दिली आहे. या विषयी सिडकोच्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता, महामेट्रोकडून वेगाने काम करण्यात येत असल्‍याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT