Crime  sakal
मुंबई

नालासोपारा : भिंतीवरून वाद, भावाने केला बहिणीवर कोयत्याने हल्ला

CD

नालासोपारा : संपत्तीच्या वादातून सख्ख्या भावाने मोठ्या बहिणीवर (sister murder) कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना विरारमध्ये (virar) घडली आहे. या हल्ल्यात बहीण गंभीर जखमी असून तिच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आरोपी भावाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. (Nalasopara crime news)

विरार पश्‍चिमेकडील भाजीमार्केट गल्लीत स्मिता सुधीर शाह (वय ६५) आणि राजू पाटील (वय ५०) यांचे शेजारीशेजारी घर आहे. गेल्या काही दिवसांपासून या भावा-बहिणीमध्ये संपत्तीसह घराच्या भिंतीवरून वादविवाद चालू होता. गुरुवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास सामायिक भिंतीवरून पुन्हा वाद निर्माण झाला. या वादातून राजू याने बहीण स्मिता हिच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्मिता यांनी आरडाओरड केली.

या वेळी घरातील अन्य मंडळी आणि शेजाऱ्यांनी धाव घेत जखमी स्मिता यांची सुटका करत संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी भावाविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली असल्याची माहिती विरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Vardha News: लोकप्रतिनिधींना जमले नाही, ते शेतकऱ्यांनी करून दाखविले; प्रशासनाला दाखविला आरसा, ३० वर्षांनतर हिवरा-पिपरा पांदण रस्त्यावर धावली चारचाकी

MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का

Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग १०व्या दिवशी चौकशी

SCROLL FOR NEXT