KDMC sakal media
मुंबई

KDMC : हिंदूत्वाच्या मुद्द्याला राजकीय रंग; पालिका निवडणुकांची रणधुमाळी

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : पालिका निवडणुकांची (kdmc election) रणधुमाळी सुरू झाली असून विकासकामांचा मुद्दा या निवडणुकीत गाजण्याची शक्यता असतानाच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून (Hinduism politics) पालिका निवडणुकीला रंग दिला जात आहे. महाविकास आघाडी सरकारमधील (mva government) काँग्रेस पक्षाचे लांगुलचालन करण्यासाठी हिंदुत्वाचे विचारच पुसून टाकण्याचा प्रयत्न शिवसेना करत असल्याचा आरोप करीत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra chavan) यांनी शिवसेनेला डिवचले आहे. यावर शिवसेनेचे मुळ हिंदुत्व असून त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असा प्रतिटोला शिवसेनेने लगावला आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांची प्रारूप यादी जाहीर झाली आहे. यामध्ये भाजपचे काही प्रभाग हे इतर प्रभागांशी जोडले गेल्याने भाजपमधील प्रस्थापितांचीच कोंडी झाली आहे. नव्या प्रभागरचनेत डोंबिवलीतील स्वा. सावरकर रस्ता या प्रभागाचे नावच रद्द करण्यात आले आहे. त्यासोबतच स्वातंत्र्यदिनी शिवसेनेने लावलेल्या बॅनरवर स्वा. सावरकरांचे छायाचित्र नव्हते. सत्तेतील काँग्रेसचे लांगुलचालन करण्यासाठी डोंबिवलीतून हिंदुत्ववादी विचार संपविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला आहे.

शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी स्वातंत्र्यदिनी शहरात जे बॅनर लावले होते त्यामध्ये सावरकर रस्ता प्रभागात सावरकर यांची छायाचित्रे नव्हती. महाविकास आघाडी सरकारमध्ये ‘सावरकरद्वेष’ किती ठासून भरला आहे, हे या दोन घटनांवरून दिसून येते, असे म्हणत चव्हाण यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला डिवचले. चव्हाण यांनी केलेल्या आरोपांचे शिवसेनेने खंडण केले असून शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले, आमदार चव्हाण यांनी प्रथम डोंबिवलीतील आपली कामे करावीत. सावरकरांना भारतरत्न द्यावा म्हणून शिवसेनेने मोठी स्वाक्षरी मोहीम राबवली, असा पलटवार मोरे यांनी भाजपवर केला.

धूळ खात पडलेले डोंबिवलीतील संकल्प तीर्थ विकसित केले. शिवसेनेचे मूळच हिंदुत्व आहे. त्यामुळे आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवू नये. ज्या सावरकर रस्ता प्रभागात आमदार चव्हाण यांचे कार्यालय आहे तिथे सावरकरांचे छायाचित्र आहे का?

- राजेश मोरे, डोंबिवली शहरप्रमुख, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT