techer sakal
मुंबई

कोरोना काळात महामारी रोखण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षकही आघाडीवर होते.

राज्यव्यापी संप आयोजित करण्यात आला असून तो अटळ

CD

मालाड: कोरोना काळात महामारी रोखण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षकही आघाडीवर होते. राज्यातील शिक्षकांच्या मागण्यांमध्ये राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे २३ व २४ फेब्रुवारीला राज्यव्यापी संप आयोजित करण्यात आला असून तो अटळ असल्याचा इशारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सचिव अविनाश दौंड यांनी दिला. दादर येथील छबिलदास लल्लुभाई विद्यालय सभागृहात माध्यमिक शिक्षक संघातर्फे शनिवारी (ता. १२) आयोजित शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते.

राज्यात २००५ पासून सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू केल्याने त्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. या योजनेतील कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी आणि कुटुंब विमा नाकारला आहे. प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्तीनंतर तुटपुंजी रक्कम त्यांच्या हाती मिळणार असून उर्वरित रक्कम भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करून सरकार या कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचा जुगार खेळत आहे. याकरिता सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासाठी हा दोन दिवसीय राज्यव्यापी जाहीर केला आहे. या मेळाव्यात शिक्षकांना प्राध्यापक संघटनेचे किशोर टेकेदत्त, शिक्षक संघटनेचे सतीश इनामदार, नानासाहेब पुंदे, ज्योती नेटवटे यांनी मार्गदर्शन केले.

रिक्त पदे भरावीत
राज्यात सुमारे दोन लाख सरकारी पदे रिक्त आहेत. त्याचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवर पडत आहे. सरकारने तातडीने सर्व रिक्त पदे भरली पाहिजेत. राज्यातील हजारो कंत्राटी कामगारांना सेवेत कायम केले पाहिजे आणि अनुकंपा धारकांना प्राधान्याने सेवेत रुजू करून घेतले पाहिजे, अशी आग्रही मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT