arrested sakal media
मुंबई

नवी मुंबई: अल्पवयीन मुलीला पळविले; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : रबाळे परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला (Minor girl abduction) फूस लावून पळवून नेणाऱ्या आकाश पाटील (culprit aakash patil) या आरोपीला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कोल्हापूर येथून मुलीसह ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात असलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला पालकांच्या स्वाधीन केले. अल्पवयीन मुलगी रबाळे (rabale) परिसरात राहते. काही महिन्यांपूर्वी त्याच परिसरात राहणाऱ्या आकाश पाटील या तरुणासोबत ओळख होऊन मैत्री झाली.

त्यानंतर आकाश याने पीडित मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि फूस लावून पळवून नेले होते. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने मुलीच्या आई-वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेऊन रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला होता.
दुसरीकडे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक पराग सोनवणे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता.

पथकाने तांत्रिक तपासाद्वारे माहिती काढली असता, या गुन्ह्यातील पीडित मुलगी आणि आरोपी आकाश पाटील हे दोघे कोल्हापूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कोल्हापूर पेठ पडगाव येथे दोघांचा शोध घेऊन मुलगी व आकाश पाटील या दोघांना ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT