Pratap Sarnaik
Pratap Sarnaik Sakal Digital
मुंबई

प्रताप सरनाईकांच्या मागणीवर भाजपा म्हणतंय, झोपी गेलेले आता जागे झाले!

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २३ : ठाणे शहरातील थीम पार्क व बॉलीवूड पार्कमधील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा चौकशी अहवाल जाहीर करण्याची शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी नुकतीच पालिका आयुक्त आणि महापौर यांच्याकडे मागणी केली आहे; परंतु ही मागणी म्हणजे `झोपी गेलेला जागा झाला'', असा टोला भाजपचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी लगावला आहे. (Pratap Sarnaik Vs Bjp in Thane)

आमदार सरनाईक यांच्या मतदारसंघात नवे ठाणे-जुने ठाणे हे थीम पार्क, तर वर्तकनगर भागात बॉलीवूड पार्क उभारण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप साडेतीन वर्षांपासून होत आहेत. या प्रकरणातील भ्रष्टाचारावर अनेकदा चर्चा झाली. या संदर्भात नेमलेल्या सर्वपक्षीय सदस्यांचा चौकशी अहवाल प्रशासनाकडे सादर करून सव्वादोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, तोपर्यंत मौन धारण करणाऱ्या सरनाईकांना आता पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौकशी अहवाल आठवल्याचा टोला मनोहर डुंबरे यांनी लगावला.

या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी व संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची भाजपची पूर्वीपासूनची मागणी आहे. त्याचबरोबर संबंधित कंत्राटदार व राजकीय नेत्यांच्या संबंधांची चौकशी करण्याचाही आग्रह आहे. मात्र, त्याबाबत पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने टोलवाटोलवी केल्याचे डुंबरे यांनी म्हटले आहे.

प्रकल्पासाठी नियुक्त केलेला सल्लागार हाच कंत्राटदार झाला, हे गौडबंगाल आहे. या प्रकरणातील गैरव्यवहारांबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी निश्चितपणे विधिमंडळाच्या सभागृहात चर्चा घडवून आणावी. या चर्चेचे भाजप स्वागत करीत आहे.
- मनोहर डुंबरे, भाजप गटनेते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT