double-decker bus
double-decker bus Google
मुंबई

डबल डेकर बसमधून करा नवी मुंबई दर्शन; परिसराचा होणार कायापालट

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : शहरात ‘डबलडेकर’ बस (double-decker bus) आणण्यात येणार आहेत. या बसद्वारे सिडको (cidco) हद्दीतील पर्यटनस्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. वातानुकूलित अशा या बस विजेवर धावणाऱ्या असतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport), मेट्रो प्रकल्प, जेएनपीटी बंदराचा विकास, लॉजिस्टीक पार्क आदी प्रकल्पांमुळे आगामी काळात नवी मुंबई परिसराचा (Navi Mumbai development) कायापालट होणार आहे. शहरात सुखकर वास्तव्याबरोबर पर्यटनाच्या सुविधाही महापालिकेला (Navi Mumbai municipal corporation) उपलब्ध कराव्या लागणार आहेत; परंतु सद्यःस्थितीत नवी मुंबई शहरात पर्यटनासाठी फारसे पर्याय नसल्याने बहुतांश कुटुंबे दर शनिवार-रविवारी शहराबाहेरच्या पर्यटन स्थळांकडे धाव घेतात.

अशा परिस्थितीत शहरातील नागरिकांना शहरातच एकदिवसीय सहलीचा अनुभव घेता यावा यासाठी महापालिकेतर्फे लवकरच डबल डेकरद्वारे पर्यटन सफारी आयोजित केली जाणार आहे. एनएमएमटी उपक्रमातर्फे इलेक्ट्रिक डबलडेकर बस खरेदी केली जाणार आहे. ही पूर्णपणे काचेची असून आत बसलेल्या पर्यटकांना वातानुकूलित वातावरणात बाहेरच्या पर्यटनस्थळांचे आणि मनमोहक दृश्यांचा आनंद घेता येणार आहे.

या पर्यटनस्थळांची सफर

इलेक्ट्रिक डबलडेकर पर्यटन बसद्वारे नवी मुंबईतील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई, खारघर हिल, बेलापूर किल्ला, पामबीच मार्गाची सफर, वाशी सी-शोर, ऐरोलीचे जैवविविधता केंद्र, ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, फ्लेमिंगो पक्षी सफारी, महापालिका मुख्यालय, वंडर्स पार्क, सानपाड्याचे सेन्सरी गार्डन, कोपरखैरणे निसर्ग उद्यान, ऐरोलीचा गवळी देव डोंगर अशी ठिकाणे दाखवण्यात येणार आहेत. शनिवार व रविवारी या बसची सफर असणार आहे.

बेलापूर जेटीपर्यंत बस सुरू करण्याचा विचार

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डातर्फे बेलापूर ते भाऊचा धक्का, घारापुरी आणि जेएनपीटी या मार्गावर स्पीड बोट आणि कॅटामरान बोट सेवा सुरू झाली आहे. बेलापूरच्या रेतीबंदर परिसरातील जेटीजवळून बोटी सुटतात; परंतु त्या जेटीपर्यंत जाण्यास काही सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय नाही. एनएमएमटीतर्फे सीबीडी-बेलापूर आणि सीवूड्स रेल्वेस्थानक ते बेलापूर जेटीदरम्यान बस सुरू करण्याचे विचाराधीन आहे. त्यासाठी प्रशासनातर्फे सर्वेक्षण सुरू केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS Live Score: आवेशने एकाच ओव्हरमध्ये पंजाबला दिले दुहेरी धक्के! धोकादायक रुसो पाठोपाठ शशांक सिंगही परतला माघारी

Pune Crime News : महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

SCROLL FOR NEXT