cctv camera sakal media
मुंबई

नवी मुंबईवर १,५०० CCTV कॅमेऱ्यांची असणार नजर; खाडीकिनारी नऊ थर्मल कॅमेरे

सकाळ वृत्तसेवा

वाशी : नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Municipal corporation) हद्दीत सीसी टीव्ही कॅमेरे (cctv camera) लावण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. संपूर्ण शहरावर १,५०० सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टम लिमिटेड कंपनीने पोलिसांसमवेत (Police) सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
नवी मुंबई महापालिकेचे सध्या शहरात २८२ ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे आहेत; परंतु शहरातील सर्वच विभागांत महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्या (People safety) दृष्टीने महापालिका १५० कोटी रुपये खर्चातून अत्याधुनिक पद्धतीने शहर सीसी टीव्हीच्या नजरेत येणार आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिकेच्या हद्दीतील महत्त्वाची निवडक ठिकाणे, तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी देखरेखीसाठी पालिकेने २०१२ रोजी २८२ सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. आता शहरात १,५०० अत्याधुनिक नवीन कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून लालफितीत व दरांवरून कोलांटउड्या घेत होता.

नवी मुंबई शहरात प्रवेश करण्यात येणाऱ्या ऐरोली-मुलुंड उड्डाणपूल, ठाणे-दिघा रोड, शिळफाटा जंक्शन, वाशी टोल नाका, बेलापूर किल्ले गावठाण व बेलपाडा अशा सर्वच प्रवेशद्वारांवर, तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. शहराच्या प्रत्येक प्रवेश-निर्गमन जागेवर हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच शहरात येणाऱ्या वाहनाबाबतची माहिती ठेवण्यासाठी स्वयंचलित पद्धतीने नंबर प्लेट वाचण्यासाठी एएनपीआर कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच शहरातील २७ मुख्य चौकांसाठी १०८ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

४३ ठिकाणी पॅनिक अलार्म बॉक्स

पामबीच मार्ग, ठाणे बेलापूर रोड, पालिका हद्दीतील सायन-पनवेल रोड येथे हायस्पीड कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील ४३ ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉलबॉक्सची सोय असणार आहे.

खाडीकिनारी नऊ थर्मल कॅमेरे

पोलिस आयुक्तालयाच्या मागणीनुसार देशविघातक व घातपात कृत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी खाडी व समुद्र किनारे अशा नऊ ठिकाणी थर्मल कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

आठ स्थानिक नियंत्रण कक्ष

आठ ठिकाणी स्थानिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. नवी मुंबई महापालिका मुख्यालय केंद्रीय नियंत्रण कक्ष पोलिस आयुक्तालय यांच्याशी जोडण्यात येणार आहे.

नवी मुंबई शहरात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याच्या कामासाठीचा कार्यादेश दिला आहे. त्यानुसार पोलिसांसमवेत सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. आता त्यापुढील तांत्रिक व इतर सर्वच कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. पुढील नऊ महिन्यांत संपूर्ण शहर सीसी टीव्हीच्या नजरेत येणार आहे.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

कोणते व किती कॅमेरे?
हाय डेफिनेशन कॅमेरे
९५४
पीटीझेड कॅमेरे
१६५
वाहनांची गती देखरेख कॅमेरे
९६
पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स सुविधा
४३ ठिकाणे
खाडी व समुद्रकिनारे देखरेख थर्मल कॅमेरे

सार्वजनिक घोषणा ठिकाणे
१२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT