Weight Loss
Weight Loss Sakal
मुंबई

दीड वर्षात ४५ किलो वजन कमी!

सकाळ वृत्तसेवा

लठ्ठपणासह पोलिओग्रस्त असलेल्या एका ६२ वर्षीय व्यक्तीचे वजन ४५ किलोने कमी करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

मुंबई - लठ्ठपणासह (Fat) पोलिओग्रस्त (Polio Affected) असलेल्या एका ६२ वर्षीय व्यक्तीचे वजन ४५ किलोने कमी (Weight Loss) करण्यात डॉक्टरांना (Doctor) यश आले आहे. मुंबईत राहणारी संबंधित व्यक्ती अनेक वर्षांपासून नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार आणि स्लीप ॲप्नियाने ग्रस्त होती. बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेनंतर दीड वर्षामध्ये तिचे वजन ४५ किलोने कमी झाले आहे.

मुंबईत राहणारे हिंमतलाल शहा (६२) यांना जन्मानंतर सहा महिन्यांत पोलिओचे निदान झाले. २०१५ मध्ये पडल्यामुळे त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. शस्त्रक्रियेनंतर पायात रॉड घालण्यात आले. त्यानंतर त्यांना फक्त वॉकरच्या मदतीने चालता येत होते. तीन वर्षांनंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला आणि चालता येणेही कठीण झाले. अंथरुणाला खिळल्यामुळे त्यांचे वजन खूप वाढले. स्लीप ॲप्नियामुळे त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यांच्या कुटुंबीयांनी लॅप्रोस्कोपिक आणि बॅरिॲट्रिक सर्जन डॉ. अपर्णा भास्कर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यावर बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेच्या वेळी त्यांचे वजन १५० किलो होते. जास्त वजनामुळे त्यांचे दोन्ही पाय सुजले होते. बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेनंतर त्याचे वजन अवघ्या दीड वर्षात ४५ किलोने कमी करण्यात डॉक्टरांना यश आले.

प्रथिनयुक्त आहाराची मदत

डॉ. अपर्णा भास्कर म्हणाल्या, ‘रुग्ण उपचारासाठी आला तेव्हा त्याचे वजन १५० किलो होते. शस्त्रक्रियेआधी दहा दिवस त्यांना उच्च प्रथिनयुक्त आहार देण्यात आला. त्यामुळे यकृताचा आकार कमी होण्यास मदत झाली. त्यानंतर रुग्णावर लॅप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमीच्या स्वरूपात बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे भूक लागण्याची संप्रेरके कमी होतात. अन्नाचे सेवन कमी होते. आता रुग्णाचे वजन नियंत्रित आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT