मुंबई

1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दल स्थापना दिन सागररक्षक रायगडच्या किनारपट्टीचे अभेद्य कवच तटरक्षक दलाचा धैर्यशाली प्रवास

CD

‘वयं रक्षाम:’
रायगडच्या किनारपट्टीला भारतीय तटरक्षक दलाचे अभेद्य कवच
पाली, ता. ३१ (वार्ताहर) ः ‘वयं रक्षाम:’ अर्थात आम्ही रक्षण करतो हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत भारतीय तटरक्षक दल स्थापना दिन आज (१ फेब्रुवारी) साजरा करत आहे. महाराष्ट्राच्या ७२० किमी किनारपट्टीमध्ये रायगड जिल्ह्याची १२२ किमीची किनारपट्टी ऐतिहासिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत मोलाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा वारसा सांगणाऱ्या या भूमीला आज भारतीय तटरक्षक दल आपल्या ‘वयं रक्षाम:’ (आम्ही रक्षण करतो) या ब्रीदवाक्याप्रमाणे अभेद्य सुरक्षा प्रदान करत आहे.
रायगडच्या सागरी सुरक्षेचा विचार करताना १९९३ चे शेखाडी (ता. श्रीवर्धन) आणि दिघी प्रकरण डोळ्यासमोर येते. त्याकाळी यंत्रणेतील त्रुटींचा फायदा घेत शत्रूने येथे शस्त्रास्त्रे उतरवली होती. मात्र, त्या काळ्या सावलीतून बाहेर येत आज तटरक्षक दलाने या किनाऱ्याचे रूप पालटले आहे. विशेषतः २००८ च्या २६/११ हल्ल्यानंतर लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेमुळे रायगडचा समुद्र आता शत्रूसाठी दुर्गम झाला आहे.
आजचा स्थापना दिन हा रायगडच्या किनाऱ्यावर अहोरात्र पहारा देणाऱ्या त्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. उत्तरेकडील उरण तालुक्यापासून ते दक्षिणेकडील श्रीवर्धन तालुक्यापर्यंत अथांग पसरलेला हा किनारा आज तटरक्षक दलामुळे सुरक्षित आणि समृद्ध आहे.
आज रायगडचा किनारा जवानांच्या गस्तीसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जाळ्यात आहे. रडार नेटवर्क हे कोर्लई, श्रीवर्धन व इतर ठिकाणावरील रडार स्टेशन्स समुद्रातील प्रत्येक हालचालीवर २४ तास लक्ष ठेवून असतात. तटरक्षक दलाने रायगडच्या मच्छीमारांना सागरी डोळे म्हणून प्रशिक्षित केले आहे. बायोमेट्रिक ओळखपत्रांमुळे सुरक्षेची खात्री झाली असून, मच्छीमार आणि जवान यांच्यातील समन्वय २०२२ मधील हरिहरेश्वर शस्त्रसाठा प्रकरणासारख्या घटनांमध्ये मैलाचा दगड ठरला आहे. केवळ रक्षकच नव्हे, तर देवदूत तटरक्षक दलाची भूमिका केवळ सागरी सीमारक्षणापुरती मर्यादित नाही.
रायगडमधील पर्यटनाचे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यातही या दलाचा मोठा वाटा आहे. आपत्ती व्यवस्थापन जसे चक्रीवादळे किंवा अतिवृष्टीच्या काळात भरकटलेल्या नौकांना वाचवण्यासाठी तटरक्षक दलाची चेतक हेलिकॉप्टर्स देवदूताप्रमाणे धावून येतात. रायगडच्या किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांचे संरक्षण असो किंवा समुद्रातील तेलगळती रोखणे, निसर्गाचा समतोल राखण्यात हे जवान तत्पर असतात. जेएनपीए बंदर, ओएनजीसी आणि आरसीएफसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पांना हे दल सुरक्षेचे कवच पुरवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

Baramati Crime News : बारामतीत चोरटयांनी 25 लाखांचे दागिने केले लंपास; अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी चोरटयांचा धुमाकूळ....

SCROLL FOR NEXT